pension sakal
नागपूर

Pension scam: महिला कर्मचाऱ्यांकडून झालेला लाखोंचा घोटाळा समोर; समितीकडून तपासणी सुरू

पेंशन घोटाळा : चौकशी समितीकडून कागदपत्रांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेत समोर आलेल्या पेंशन घोटाळा प्रकरणात अनेक खळबळजनक बाबी समोर येत आहेत. संबंधित महिला कर्मचारी महिन्याला लाखो रुपयांची अफरातफर करीत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज चौकशी समितीने कागदपत्र ताब्यात घेत तपासणी सुरू केली. परंतु, काही जुन्या फाइल्स मिळाल्या नसल्याचे समजते.

पारशिवनी पंचायत समितीअंतर्गतच्या शिक्षण विभागामध्ये महिला कनिष्ठ लिपिक सरिता नेवारे गेल्या २०१२ पासून सेवानिवृत्तांच्या पेन्शनचा टेबल सांभाळत होत्या. पारशिवनी पं.स.अंतर्गत सुमारे १९० वर सेवानिवृत्त शिक्षक आहेत.

मृत झालेल्या कर्मचाऱ्यांचे हयात (जिवंत असल्याचे) प्रमाणपत्र जोडून त्यांची पेंशन जवळच्या नातेवाइकांच्या बॅंक खात्यात वळती करीत होती. गेल्या ९ वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान संबंधित महिला कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासणीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज पंचायत समितीत धडक देत कागदपत्र ताब्यात घेतले. त्यांची तपासणी सुरू केली.

तपासणी समितीचे डोळेच पांढरेच झाले. अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. जुन्या काही फाइल समितीच्या पथकाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे अशा फायलींचा शोध घेण्याचे कामही त्यांच्याकडून होत आहे. १० ते १२ नागरिकांची पेन्शन महिला कर्मचारी नातेवाइकांच्या खात्यावर वळता करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नेवारे सहा बॅंकांमध्ये रक्कम वळती करीत असल्याचे उघड झाले. त्यापैकी काही बँक खाते संबंधित महिला लिपिकेच्या २०१९ मध्ये मृत्यू पावलेल्या पतीचे, स्वत:चे, कुटुंबातील इतर सदस्यांचे, ओळखीच्यांचे होते. विविध सहा बँकांमध्ये ही खाते असल्याचे सांगण्यात येते.

असे आले प्रकरण समोर

मार्च २०२२ मध्ये पं.स.स्तरावर सर्व सेवानिवृत्तांच्या हयातीचे (जिवंत असल्याचे) दाखले तपासण्यात आले. त्यावेळी तीस पेक्षा अधिक दाखले आले सादर झाले नव्हते. त्यानंतर पं.स.अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींकडून दाखले मागविले. त्यानंतर काहींनी ते आणून दिलेत. परंतु १०-१२ लोकांचे दाखले आले नाहीत. अधिकाऱ्यांनी या सेवानिवृत्तांचे दाखले येणार, असे गृहित धरून २-४ महिने प्रतीक्षा केली. परंतु दाखले आले नाहीत. पेन्शनची रक्कम रोखण्यात आली. दरम्यान अधिकाऱ्यांनी दाखले न आलेल्यांच्या बँकांमध्ये जाऊन मोबाईल क्रमांक व पत्ता मिळविला. त्यावरून त्यांच्याशी संपर्क साधला असता. परंतु ते व्यक्ती दुसरेच कुणी असल्याचे निदर्शनास आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT