नागपूर

Nagpur:पेट्रोलियम कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची २ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात अंबाझरीत गुन्हा दाखल

पेट्रोलियम कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तीस टक्के नफा देण्याचे आमिष दाखवित एका व्यापाऱ्याला दोन कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Petroleam Company Investment Fraud: पेट्रोलियम कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तीस टक्के नफा देण्याचे आमिष दाखवित एका व्यापाऱ्याला दोन कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी लतिश कुमार भरतन (रा. रामनगर तेलंगखेडी) यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिस ठाण्याचा केरळच्या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

विजयन पिल्लई, विजयाकुमारी पिल्लई आणि नझीम हनीफा रॉथर अशी आरोपींची नावे असून ते केरळमधील कन्ननकुझी मुरी, अल्लापूजा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही लतीश कुमार यांच्या ओळखीचे असून २०१२ मध्ये लतीश यांच्यासोबत संपर्क साधून जया फ्युअल्स पेट्रोलियममध्ये गुंतवणूक केल्यास ३० टक्के परतावा देण्याची तयारी दाखविली होती. (Latest Marathi News)

लतीश यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवित गुंतवणूक केली. मात्र, आजवर कोणताही लाभ दिला नाही. त्यांनी मोबदल्याची मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ केली. वाढत्या दबावामुळे आरोपींनी पुढील तारखेचे एकूण १ कोटी ८४ लाख ९४ हजार रुपयांचे २ धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. त्यानंतर आरोपींसोबत संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंबाझरी ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरण आर्थिक शाखेकडे वर्ग केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT