Railway sakal
नागपूर

Railway : रेल्वेच्या मराठीकरणासाठी मराठीजन एकवटले

रेल्वेत इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वावर रेल्वे प्रशासनाकडून होतो. रेल्वेतील सूचना व माहिती देणाऱ्या पाट्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत हिंदीचा अधिक प्रभाव जाणवतो.

सकाळ वृत्तसेवा

रेल्वेत इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वावर रेल्वे प्रशासनाकडून होतो. रेल्वेतील सूचना व माहिती देणाऱ्या पाट्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत हिंदीचा अधिक प्रभाव जाणवतो.

नागपूर - रेल्वेत इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वावर रेल्वे प्रशासनाकडून होतो. रेल्वेतील सूचना व माहिती देणाऱ्या पाट्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत हिंदीचा अधिक प्रभाव जाणवतो. या विरोधात मराठीजन एकवटले असून मराठीचा वापर, मराठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आदी मागण्यांसाठी मराठी एकीकरण समितीने पत्र मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये झळकणाऱ्या भाषांतरित मराठीतील सूचनांमुळे भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्‍त केली होती. मराठी भाषेचे धिंडवडे काढणाऱ्या रेल्वे विभागाविरोधात भाषाप्रेमींनी रोष व्यक्‍त केला आहे. या संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशींनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांना पत्र लिहून संतप्त भावना व्यक्त केल्यात. याच पत्राला अनुसरून रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी मराठीप्रेमींनी प्रशासनाला पत्र पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पत्रांमधून मराठी भाषिकांमधील असंतोष रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होत आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुविधा अंतर्गत डब्यांमध्ये फलक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या स्क्रीनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचना देण्यात येतात. मात्र, तेजस एक्सप्रेसमध्ये हिंदी आणि इंग्रजीमधील सूचनांचे सरसकट भाषांतर करीत हा मजकूर वापरण्यात आल्याचे फोटो प्रसिद्ध झाले. यामध्ये ‘तुमचा प्रवास सुखाचा आणि सोयीचा हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा, कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे, तुमची आपली वस्तू एका बाजूला ठेवू नये’ अशा सूचना स्क्रीनवर झळकल्या. त्यामुळे, मराठी भाषाप्रेमींमध्ये रोष वाढला आहे.

मराठी भाषेचा असा अवमान करणारा व अतिशय चुकीचा असा मराठी भाषेचा वापर रेल्वे विभागाने तत्काळ थांबवावा. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांच्या सर्व विभागांमधून सर्व स्तरावरील कार्यालयात, हिंदी कक्ष व हिंदी अधिकारी असतात. या प्रमाणे मराठी भाषा कक्ष आणि मराठी भाषा अधिकारी नेमले जावेत.

- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संयोजक मराठी एकीकरण समिती, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT