नागपूर

Sand Mafiya Crime: वाळू माफिया मोकाट! कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी, दोन दिवसांत दुसरी घटना

जिल्ह्यात वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी वाठोडा भागात कारवाई करताना तहसील कार्यालयाच्या मंडळ अधिकाऱ्याला वाळू माफियांच्या टोळीने चक्क घेराव घातला, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Sand Mafiya: जिल्ह्यात वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी वाठोडा भागात कारवाई करताना तहसील कार्यालयाच्या मंडळ अधिकाऱ्याला वाळू माफियांच्या टोळीने चक्क घेराव घातला, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

विशेष म्हणजे आरोपी सर्व क्रेटा व ब्रिझा या चारचाकी वाहनाने आले होते. त्या कारला नंबर प्लेटही नव्हती. रामटेकच्या एसडीओ वंदना सवरंगपते यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण ताजे असताना वाठोड्यातील या घटनेमुळे तहसील कार्यालयातील अधिकारी धास्तावले आहेत.

मंडळ अधिकारी अनिल ब्रम्हे (५३) रा. सक्करदरा हे पथकासह बहादुरा फाटा, उमरेड मार्गावर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत होते. दरम्यान सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आरोपी ट्रक चालक अशरफ खान (२९) रा. खरबी आणि ट्रक मालक जावेद खान (३२) रा. बाबा फरीदनगर हे वाळूचा ट्रक घेऊन जात असताना पथकाने थांबविले. ट्रकची तपासणी करताना आरोपींनी पाच ते सहा अनोळखी इसमांना बोलाविले. (Latest Marathi News)

त्या सर्वांनी मंडळ अधिकाऱ्याचा घेराव केला. शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच जिवानिशी ठार मारण्याची धमकी देऊन पळून गेले. घाबरलेले ब्रम्हे यांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली.

का निर्ढावले वाळू तस्कर ?

सरकारने वाळूचा लिलाव बंद केला आहे. आता डेपोच्या माध्यमातून ऑनलाईन मागणीद्वारे वाळूचा पुरवठा केला जातो. मात्र, हे धोरण नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. वाळूचा पुरवठा होत नसल्याने बांधकाम प्रभावित झाले आहे. त्याचा फायदा वाळू माफिया घेत आहेत. तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणारी वाळू माफियांची टोळी सक्रिय आहे. अनेक दशकापासून त्यांचे एक छत्री राज्य सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT