Nagpur Esakal
नागपूर

Nagpur: कोण मारतय सडक्या सुपारीवर ताव? अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केलेला माल लंपास; हा व्यक्ती निघाला मास्टरमाईंड

वाडी पोलिस हद्दीतील सुराबर्डी परिसरात सुपारी गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत सुपारीची १८४ पोती जप्त केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Seized Material Stolen From Godown: वाडी पोलिस हद्दीतील सुराबर्डी परिसरात सुपारी गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत सुपारीची १८४ पोती जप्त केली होती. यानंतर तेथील व्यवस्थापकाने तो संपूर्ण माल लंपास केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी ललित प्रभुदास सोयाम (वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोहनलाल नंदलाल चव्हाण असे व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुराबर्डी येथे गोपाळ बळीराम अग्रवाल यांचे गोदाम आहे. डिसेंबर महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने या गोदामावर छापा टाकून १८४ पोती सडकी सुपारी जप्त केली होती.

या कारवाईनंतर ती पोती गोदामात एका बाजूला ठेऊन गोदामाचे व्यवस्थापक सोहनलाल चव्हाण याच्याकडे मालाची जबाबदारी दिली होती. याशिवाय इतर सुपारीच्या कारवाईतील पोतीही या ठिकाणी एकत्र ठेवण्यात आली होती. पंचासमक्ष पोत्यांची मोजणी करून त्याचा ताबा सोहनलाल याच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी ललित प्रभुदास सोयाम यांनी या गोदामाची तपासणी केली. (Latest Marathi News)

मात्र, त्यांना एकूण पोत्यांपैकी ५०६ पोती गायब झाल्याचे दिसले. त्यांनी सोहनलाल यांना विचारणा केली. मात्र, त्याने काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोहनलाल चव्हाण विरोधात दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक अविनाश निकालजे आणि उत्तम जायभाये तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT