नागपूर

Nagpur Theft Case: पितळी भांडे धुवायला आले अन् दागिने घेऊन गेले, भरदुपारी घडली चोरीची घटना

पितळी भांडे स्वच्छ करून देण्याच्या नावावर दोन चोरट्यांनी महिला व तिच्या सुनेचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Theft Case in Shantinagar: पितळी भांडे स्वच्छ करून देण्याच्या नावावर दोन चोरट्यांनी महिला व तिच्या सुनेचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय महिलेच्या घरी गुरुवारी दुपारच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी पितळी भांडे स्वच्छ करून देतो अशी बतावणी केली. महिलेने पितळी तांब्या स्वच्छ करण्याकरिता दिला. ते स्वच्छ करून देताच, त्यांनी आपल्या सुनेच्या पायातील चाळही स्वच्छ करण्यासाठी दिली.

ती स्वच्छ केल्यावर दोघांनी सोन्याचे दागिनेही स्वच्छ करून देतो असे सांगितले. महिलेने ७८ हजार ८४२ रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोत स्वच्छ करण्यासाठी त्यांच्याकडे दिल्या. दोघांनीही सुनेला हळद आणण्यास सांगितले. त्या आत गेल्यावर चोरट्यांनी महिलेचे दागिने डब्यात ठेवल्याचे भासविले आणि ते गॅसवर ठेवण्यास सांगून पसार झाले. दरम्यान सुनेने डबा उघडून बघितला असता, त्यात दागिने दिसले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजले.(Latest marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT