Nagpur  Esakal
नागपूर

Traffic Police on Broken Number Plate: अनाधिकृत नंबरप्लेट लावणाऱ्यांवर कारवाईचा दंडूका; पाच लाखांचा ठोठावला दंड

शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे जिल्ह्यातील वाहनांवर अनधिकृत नंबर प्लेट (ब्रोकन नंबर प्लेट) लावून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे विशेष मोहीम राबविण्याची कारवाई करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Traffic Police Action on Drivers: शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे जिल्ह्यातील वाहनांवर अनधिकृत नंबर प्लेट (ब्रोकन नंबर प्लेट) लावून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे विशेष मोहीम राबविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी एक हजार वाहन चालकांना पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील वाहनावर अनाधिकृत नंबर प्लेट (ब्रोकन नंबर प्लेट) वाहन वाहन चालवणाऱ्यांवर कलम ५० /१७७ मोटार वाहन कायदा प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात १९ ते २५ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम राबविली.

मोहीमेदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व अमंलदार यांनी एक हजार १७ वाहन चालकांवर कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी पाच लाख ८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. (Latest Marathi News)

पोलिसांमार्फत पुढील काळात सुद्धा अशीच मोहीम राबविण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन चालविताना वाहनांचे कागदपत्रे सोबत बाळगावे व वाहनावर प्रलंबित दंड असल्यास वाहतूक पोलिस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Satej Patil : गोकुळमध्ये कोरमचा पेच सुटणार? गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी २५ संचालक एकत्र येतील; सतेज पाटलांना विश्वास

अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांना बॉम्बहल्ल्याची धमकी; दादरमधील चार शाळांनाही ईमेल, तपास सुरू

PM Kisan 24th Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, 'या' दिवशी खात्यात येणार २००० रुपये; 'पीएम किसान' च्या हप्त्याची तारीख जाहीर

Marathi News Live Updates: जिओ IPO चा ऐतिहासिक विक्रम! 1 कोटी अर्जांचा टप्पा पार करत मोडले सर्व रेकॉर्ड

Cybercrime: दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; पाच बँक कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT