Deekshabhoomi Nagpur esakal
नागपूर

Deekshabhoomi Nagpur: दीक्षाभूमीतल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा काय आहे वाद? का होतोय विरोध?

Deekshabhoomi Nagpur Explained: राज्य सरकारने दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी पुरवला आहे. या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे परिसरात सुरू आहेत. स्मारक समितीने विकासकामांचा आराखडा तयार केला आहे.

Sandip Kapde

दीक्षाभूमीमध्ये विकास प्रकल्पाचे काम सुरू असताना, अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी समाजबांधवांनी कडाडून विरोध केला आहे. सोमवारी मोठ्या संख्येने समाजबांधव दीक्षाभूमीवर एकत्र आले आणि त्यांनी पार्किंगचं काम थांबवलं. आंदोलकांनी बांधकाम साहित्य आणि बोर्डाची तोडफोड केली आहे. शिवाय बांधकाम साहित्य पेटवून दिलं आहे. यामुळे, अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध का होतोय हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

वादग्रस्त पार्किंग-

146 कार आणि 902 बाईक पार्क करता येईल असे अंडरग्राऊंड पार्किंग प्रस्तावित होते. वाहन तळाच्या छतावर बसण्यासाठी जागा आणि शोभेची वास्तू बांधण्यात येणार होती. मात्र, अंडरग्राऊंड पार्किंग हवीच कशाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

आंबेडकरी समाजबांधवांचा विरोध का?-

दीक्षाभूमीच्या आजुबाजूला बरीच जागा आहे. तिथे बरेच अनुयायी तिथे येतात आणि बसतात. त्या जागेवर सरकार अंडरग्राउंड पार्किंग बांधत होते. या विकासकामात दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोप बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला.

हे पार्किंग धम्मचक्रप्रवर्तन दिना दिवशी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.

काही दिवसांपूर्वी स्मारक समितीच्या सदस्यांनी समाजाच्या अनुयायांसोबत या विषयावर चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी पुन्हा आज सोमवार 1 जुलैला बैठकीची तयारी दर्शविली होती. मात्र, शनिवार 29 जून रोजी समिती सदस्यांनी काही मान्यवरांशी या विषयावर चर्चा करून एनएमआरडीएसोबत भूमिगत वाहनतळाच्या पुनर्विचाराचे संकेत दिले होते.

राज्य सरकारने दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी पुरवला आहे. या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे परिसरात सुरू आहेत. स्मारक समितीने विकासकामांचा आराखडा तयार केला आहे. याच विकासकामांमध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडूजी व सुशोभिकरणाला विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

मातीच ढिगारे ठरले कारणीभूत-


सौदर्यीकरणाच्या नावावर २०० कोटी ३२ लाखाचा विकासाचा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. स्मारक समितीच्या सूचनेनुसार व मंजुरीनुसार हा आराखडा ‘एनएमआरडीए’कडून राबविला जात होता. परंतु, या कामांची माहिती आंबेडकरी अनुयायांपर्यत पोहोचली नाही. दीक्षाभूमीत खोदकाम केल्यानंतर निघालेला मलबा याच परिसरात स्मारकासमोर टाकण्यात येत होता. मातीच्या ढिगाऱ्यांनी स्मारक झाकोळले गेल्याचे दिसून आल्यानंतर अनुयायी स्मारक समितीकडे पोचले. स्मारक समितीने स्मारकासह बोधीवृक्षाला धोका होणार नाही, याचा खुलासा केला. परंतु अनुयायांचा विश्वास बसला नाही. वादाला तोंड फुटले.

विरोधामुळे राज्य सरकारची भूमिका काय?-

दीक्षाभूमी परिसरात जे पार्किंगचे काम केले जात आहे, त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडास्मारक समितीने तयार करण्यात आहे. त्यासाठी राज्य सरकारने केवळ निधी पुरवला आहे. या कामासाठी २०० कोटी रुपये दिले. स्मारक समितीच्या आराखड्याप्रमाणे भूमिगत पार्किंगचे काम हाती घेण्यात आले. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

दिक्षभूमी विकास आराखड्यात केली जाणारी कामे-

  1. दीक्षाभूमीवरील मुख्य स्तूपाच्या चारही प्रवेश दाराचे नूतनीकरण (20*12 फूट)

  2. सांची स्तूपाच्या धर्तीवर चार तोरण द्वार (20*66 फूट)

  3. स्तूपाभोवती दगडी परिक्रमा पदपथ

  4. 11 हजार 316 चौ फुटाचे व्याख्यान केंद्र

  5. 66 फूट लांब, 54 फूट रुंद व 15 फूट उंचीचे सभा मंडप

  6. दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम

  7. 33 फूट रुंद व 20 फूट उंचीचे दोन मुख्य प्रवेश द्वार, सोबत पोलीस नियंत्रण कक्ष

  8. 37 फूट उंचीचे अशोक स्तंभा सह दीक्षाभूमीचे सौंदरीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT