Nagpur youth selected for Indian Army
Nagpur youth selected for Indian Army 
नागपूर

Success Story : जिद्दीचे पंख लाऊन स्वप्नाचा केला पाठलाग; भारतीय सैन्यात निवड

नितीन कुरई

बुटीबोरी (जि. नागपूर) : बुटीबोरीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवणाऱ्या विक्की दांडेकर यांची भारतीय सैन्य दल जम्मू काश्मीर येथे निवड झाली. जम्मू-काश्मीर येथे देशसेवा करण्यासाठी पूर्णतः सज्ज झालेल्या विक्कीचा मंगळवारी बुटीबोरीतील बालभारती मैदानावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनेक तरुण आपले स्वप्न रंगवून त्या स्वप्नाचा पाठलाग करीत असतात. स्वप्नपूर्ती झाल्यानंतर मिळणारा आनंद हा अतिशय देखणा असतो. याचे दृश्य रूप आज बुटीबोरीमधील बालभारती मैदानावर पाहायला मिळाले. बुटीबोरी प्रभाग क्र.५ मध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय विक्की वामनराव दांडेकर यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून देशाकरीता काही तरी विशेष करण्याची त्याने स्वप्ने रंगविली होती. २०१५ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पोलिस भरतीची तयारी करू लागला.

दिवसरात्र मेहनत करून २०१९ ला विक्की बुटीबोरी पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत झाला. परंतु त्याची स्वप्न भारतीय सैन्य दलात दाखल होण्याची होती. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करीत असताना २२ मार्च २०२१ ला अखेर विकीचे स्वप्न साकार झाले. विक्कीची भारतीय सैन्य दल जम्मू काश्मीर येथे निवड झाल्याचे नियुक्तीपत्र हाती येताच दांडेकर कुटुंबीयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

सरावातून यश संपादन करता येते
मैदानावर पोलिस भरतीची तयारी करत असताना डोळ्यांसमोर उद्दिष्ट व कुटुंबीयांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने मी तयारी करीत होतो. कमी वेळात अधिक तयारी कसी करता येईल याकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सरावातून यश संपादन करता येते, मात्र त्याकरिता सरावाची नियमित वेळ ठरवून त्यात सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. 
- विक्की वामनराव दांडेकर, सैनिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT