ncp crisis jitendra awhad name plate remove jayant patil politics nagpur Sakal
नागपूर

NCP in Winter Session: पक्षात फुट असल्याचे आले दिसून; पक्ष कार्यालयातील आव्हाडांची पाटी निघाली

राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली असतानाही दोन्ही गटाकडून मात्र एकच पक्ष कार्यालय ठेवण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली असतानाही दोन्ही गटाकडून मात्र एकच पक्ष कार्यालय ठेवण्यात आले. आमचाच पक्ष खरा असल्याने वेगळे कक्ष मागण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून काल स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली.

त्यामुळे पक्षात फुट असल्याचे दिसून आले. दरम्यान आज बहुतांश सदस्यांनी कार्यालयात जाणे टाळल्याचे चित्र होते. त्यामुळे आता शरद पवार गटातील सदस्य कुठे बसतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधिमंडळाच्या दरबारी दोन्ही गट एकच असल्याने जुन्यानुसारच आव्हाड यांची पाटी पक्ष कार्यालयात लावण्यात आली. परंतु आज सकाळीच त्यांची पाटी काढून मंत्री अनिल पाटील यांची मुख्य प्रतोदची पाटी लावण्यात आली.

विधिमंडळ परिसरात दिवसभर हाच चर्चेचा विषय होता. दरम्यान सुरवातीला नवाब मलिक यांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचे सांगत मतदार संघातील मुद्दे सभागृहात मांडणार असून राजकीय मुद्द्यावर बोलणार नसल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT