one accused sentence 20-20 years imprisonment in 5 different cases nagpur Sakal
नागपूर

Nagpur Crime : एकाच आरोपीला पाच प्रकरणांत वीस-वीस वर्षे शिक्षा

एकाच दोषीला पाच प्रकरणांमध्ये वीस-वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : एखादा व्यक्ती कायद्याचे उल्लंघन चुकून एका वेळी करीत असेल. परंतु, एकच घटना वारंवार होत असल्यास ती चूक नाही तर त्याला त्या व्यक्तीच्या वागण्याची वृत्ती असे म्हणावे लागेल. अशा वृत्तीचे उदाहरण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेतून पुढे आहे.

एकाच दोषीला पाच प्रकरणांमध्ये वीस-वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नीलेश उर्फ ​​मिर्चीलाल किशोरी चुटेलकर (वय ३१, रा. इमामवाडा) असे न्यायालयाने दोषी ठरवलेल्या या आरोपीचे नाव आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला. या पाचही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून यातील चार शिक्षा आज तर एक शिक्षा काल सुनावण्यात आली होती. ही घटना २६ मार्च २०१५ पूर्वी घडली होती.

पाचही पीडित आणि दोषी नीलेश एकाच परिसरातील रहिवासी आहेत. नीलेश हा अल्पवयीन मुलींच्या वयाचा फायदा घेऊन खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावत असे. त्यांच्याशी गैरवर्तनही करायचा. सुमारे एक ते दीड वर्ष हे असेच चालू राहिले. ही बाब पालकांना समजताच त्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात नीलेश विरोधात तक्रार दाखल केली.

नीलेशला ३० एप्रिल २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. या खटल्यात एकूण ७९ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यावरील सुनावणीत न्यायालयाने सर्व पक्षकार व पुरावे ग्राह्य धरून पाचही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार नीलेशला दोषी ठरवून प्रत्येक प्रकरणात वीस वर्षांची शिक्षा सुनावली. राज्य सरकारकडून ॲड. रश्मी खापर्डे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT