पोलिस निलंबित  sakal media
नागपूर

POLICE : कर्तव्‍यावर ताशपत्ते खेळणारे चार पोलिस निलंबित

‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे पोलिस कधी-कधी वादात अडकतात.

सकाळ वृत्तसेवा

कामठी : नवीन कामठी पोलिस ठाण्यातील चार पोलिस शासकीय निवासस्थानात तासपत्ते खेळताना व धूम्रपान करताना आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. यात पोलिस शिपाई विलास पालांदुरकर, सुरेंद्र शेंद्रे, राजू लिखार, अनिकेत सांगळे यांचा समावेश आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे पोलिस कधी-कधी वादात अडकतात. निलंबित चारही पोलिस ६ एप्रिलला रात्रपाळीत रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत ड्युटीदरम्यान नजीकच्या शासकीय निवासस्थानात धुम्रपान करून ताशपत्ते खेळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे डीसीपी श्रवण दत्त यांनी या चारही पोलिसांना निलंबित केले आहे. लकडगंजचे सहायक पोलिस निरीक्षक यांच्या रात्रीच्या दौऱ्यात वरील प्रकार

समोर आला होता. याचा अहवाल परिमंडळ क्रमांक पाचला प्राप्त होताच निलंबनाचे आदेश काढण्यात आले. हे कर्मचारी निलंबनाच्या काळात कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करू शकणार नसल्याचे कर्तव्‍यावर ताशपत्ते खेळणारे चार पोलिस निलंबित आदेशात म्हटले आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांसोबत जवळीक

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याचे नुकतेच लग्न झाले आहे. हे निलंबन कर्तव्यात हलगर्जीपणामुळे झाले असले तरी येथील कर्मचाऱ्यांची अवैध धंदे करणाऱ्यांशी जवळीक चर्चेचा विषय आहे. नवीन पोलिस ठाणे कामठीच्या परिसरात येणाऱ्या इस्माईलपुरा भागात सट्टापट्टी मोठ्या प्रमाणात चालते. अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT