heavy rain 
नागपूर

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात; बरसताहेत मॉन्सूनपूर्व सरी

अथर्व महांकाळ

नागपूर : आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात होतेय. त्यामुळे आता शेतकरी मॉन्सूनची (Monsoon season) वाट बघत आहेत. यावर्षी मॉन्सून भारतात वेळेत दाखल झाला आहे. तर महाराष्ट्रातही मॉन्सूनचं (Monsoon in Maharashtra) आगमन झालं आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहर (Rain in Nagpur) आणि काही आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. (pre monsoon stormy rain in Nagpur)

पावसाला जरी सुरवात झाली असली तरी मॉन्सून आजू विदर्भात दाखल झाला नाहीये. मॉन्सून आधीच्या काही सारी बरसण्यास सुरुवात झाली आहे. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. त्यात सर्व दुकानं खुली करण्यात आली आहेत त्यामुळे खरेदी करणाऱ्या नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. वादळी वारीसह पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी तर टिनाचे शेड उडून गेले आहेत.

मॉन्सूनच्या विदर्भातील संभाव्य आगमनाबद्दल हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असला तरी विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाला आणखी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.

विदर्भातील मॉन्सूनचे आगमन सर्वस्वी बंगालच्या उपसागरातील सिस्टीमवर अवलंबून असते. तिथे येत्या अकरा जूनला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तो पट्टा आंध्रप्रदेशमार्गे मध्य भारताकडे सरकणार आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या १२ ते १४ जूनदरम्यान विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. तोपर्यंत विदर्भात अधूनमधून वादळासह मॉन्सूनपूर्व सरी बरसेल, असे ते म्हणाले.

(pre monsoon stormy rain in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT