state-government-employees 
नागपूर

पाच दिवसांच्या आठवड्यामुळे कर्मचारी नाराज?...वाचा नेमके काय

नीलेश डोये

नागपूर : पाच दिवसांच्या आठवड्याने कर्मचाऱ्यांमध्येच आता मतभेद होऊ लागले आहेत. सरसकट सर्वच विभागांना हा निर्णय लागू होणार नाही. मात्र, ठरल्यानुसार सर्वांनाच सुमारे पाऊण तास जादा काम करावे लागणार आहे. एकाला शनिवारची सुटी तर दुसरा कामावर, सोबतच जादा तास कामही करावे लागणार असल्याने खदखद वाढत चालली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केली आहे. एक मार्चपासून याची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता कर्मचाऱ्यांना सुमारे पाऊण तास जादा काम करावे लागणार आहे. सध्या 10 ते 5.45 कामाची वेळ आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर ही वेळ वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी राहणार आहे. जेवणाची सुटी अर्धा तासाची मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. आता ज्यांना सुटी लागू होणार नाही, त्यांनाही याच वेळेप्रमाणे यावे लागणार आहे. आधीच शासकीय कार्यालयांमध्ये वेळेत कामे होत नाहीत. कर्मचारी जागेवर राहत नाही, अशी सर्वांचीच ओरड आहे. वेळेत कामेही केली जात नाहीत. पाच दिवसांच्या निर्णयाने कामे आणखी रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांच्या कामावर परिणाम होता कामा नये म्हणून कामाचे तास वाढविण्यात येणार आहेत, असे सांगितले जात असले तरी त्याची अंमलबजावणी कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित होतो.
आपत्ती, आरोग्य व महत्त्वाच्या विभागांना पाच दिवसांच्या आठवड्यातून वगळण्यात आले आहे. शासनाने सर्वांचा विचार करून आदेश काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

निर्णयाचे स्वागत
शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. अनेक दिवसांची मागणी होती. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमा वाढेल. शिवाय विजेचीही बचत होईल.
-सोहन चवरे, अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जि. प. नागपूर

हिताचा निर्णय
कर्मचारी हिताचा निर्णय आहे. कामाची वेळ वाढविल्याने शासकीय कामांचा तातडीने निपटारा हाईल.
-सुशील शिंदे, विभागीय सचिव, समाजकल्याण कर्मचारी संघटना

निर्णय  अयोग्य
हा निर्णय योग्य नाही. काम करणाऱ्यांवर बोझा वाढणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आठ तास कामाच्या निर्णयाचेही उल्लंघन आहे. सरकारने आदेश काढताना याचाही विचार करावा.
सिद्धार्थ उके, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ.

पेन्शन योजनेचा व्हावा विचार
सरकाने जुनी पेन्शन योजनेचाही विचार करावा. त्याचप्रमाणे हा निर्णय सर्वच कर्मचाऱ्यांसाठी लागू करावा.
राज ढोमणे, नागपूर जिल्हा तृतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटना.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT