Murder Murder
नागपूर

भांडण आले अंगावर; बापलेकाच्या भांडणात शेजाऱ्याची हत्या

मंगेश गोमासे

नागपूर : मुलगा आणि वडिलांच्या वादात मधस्ती करण्यासाठी गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टीसिग्नल परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरली किसन सोनकुसरे (२८, रा. डिप्टी सिग्नल बाजार चौक) असे मृताचे नाव आहे. आरोपी १७ वर्षीय अल्पवयीन आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डिप्टी सिग्नल बाजार चौक परिसरात अल्पवयीन मुलाचे घरी वडिलांसोबत भांडण सुरू होते. या भांडणाचा आवाज शेजारच्या घरी गेला. मुलाने वडिलांवर धारदार शस्त्र काढल्याच बघून शेजारी राहणारा मुरली भांडण सोडविण्यासाठी गेला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा ऐकायला तयार नव्हता. उलट त्याने मुरलीशी वाद घातला. त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे वडिलांसोबत सुरू असलेल्या भांडणाची दिशा बदलली.

बापलेकाचे भांडण सोडविणे मुरलीच्या अंगावर आले. आमच्या घरगुती भांडणाच्या मध्ये का आला, असे म्हणून अल्पवयीन आरोपीने धारदार शस्त्राने मुरलीच्या गळ्यावर व पाठीवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यास रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास कळमना पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : दुबईची बंदरे कुलूपबंद; मागणी असूनही नाशिकचा कांदा-द्राक्षे पडून!

Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...

Khadakwasla Bridge: खडकवासला पुलाचे काम अंतिम टप्प्यात, २६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला

Latest Marathi News Live Update : आखाती देशात अडकलेल्या कोल्हापूरकरांसाठी प्रशासन सज्ज

Lasalgaon Onion Market : निर्यात घटली, भाव कोसळले! लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले

SCROLL FOR NEXT