Deekshabhoomi  sakal
नागपूर

Deekshabhoomi : दीक्षाभूमीवरील बांधकामाला स्थगिती,फडणवीस;वाहनतळाविरुद्ध नागपुरात अनुयायांचा उद्रेक

दीक्षाभूमीवर भूमिगत वाहनतळाला सुरवातीपासूनच विरोध होता. परंतु स्मारक समितीसह सरकार आणि प्रशासनाने आंबेडकरी अनुयायांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या अनुनयांच्या भावनांचा बांध फुटला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमीवर भूमिगत वाहनतळाला सुरवातीपासूनच विरोध होता. परंतु स्मारक समितीसह सरकार आणि प्रशासनाने आंबेडकरी अनुयायांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या अनुनयांच्या भावनांचा बांध फुटला.

त्यांनी सोमवारी सकाळी दीक्षाभूमीवर गर्दी केली. समितीचा कोणताही सदस्य न पोचल्याने भूमिगत वाहनतळात जाळपोळ केली. बांधकाम बंद पाडले. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीवरील भूमिगत वाहनतळासह बांधकामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली.

दीक्षाभूमी परिसरात आज सकाळपासूनच अनुयायी येत होते. भूमिगत खोदकामामुळे स्तूप व बोधीवृक्षाला धोका पोहोचेल. यासंदर्भातील भूमिका मांडण्यात स्मारक समिती व प्रशासनास अपयश आल्याने अनुयायांमध्ये संताप होता. समितीच्या सदस्यांनी ‘एनएमआरडीए’च्या नावाने पत्र प्रसिद्ध करत भूमिगत वाहनतळाचे बांधकाम १ जुलैपासून तत्काळ प्रभावाने बंद करीत आहोत, असे जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT