नागपूर

Teacher Recruitment: पुढील दोन महिन्यांत शिक्षकांची भरती प्रक्रिया ! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

सकाळ डिजिटल टीम

Education Minister Dipak Kesarkar: शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाही. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरू केली जाणार आहे. याशिवाय येत्या दोन महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. जयंत पाटील यांनी लहान शाळा, एक शिक्षकी शाळा बंद करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप केला होता.(Latest Marathi News)

शाळा बंद केल्यास शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. सत्ताधारी भाजपचे ॲड. आशिष शेलार यांनीही फक्त पंधरा दिवसांत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आल्याकडे लक्ष वेधले.

नाना पटोले यांनी राज्यात शिक्षकांचे सव्वा लाख पदे रिक्त असल्याचे सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी शाळाबाह्य मुलांचा तीन हजार हा आकडा फारच कमी असून केवळ मेळघाटातच १० हजार मुले शाळाबाह्य निघतील, पुन्हा सर्वेक्षण करणार का, असा सवाल उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी शिक्षकांची पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला. यशोमती ठाकूर यांनी स्थलांतरित मुलांचाही प्रश्न उपस्थित केला. (Latest Marathi News)

‘शाळेत चला अभियान’ राबविणार
राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT