नागपूर

दिलासा : पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नाही

राजेश चरपे

नागपूर : मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन (Rainy convention) दोनच दिवसांचे होणार आहे. त्यामुळे तारांकित प्रश्न व लक्ष्यवेधी सूचना मांडता येणार नाही. सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न, मुद्दे मांडता येणार नाही. प्रशासनाला प्रश्नांच्या स्पष्टीकरणातून मुक्ती मिळाली आहे. कोरोनामुळे अधिवेशनच कमी दिवसांचे (The convention lasted two days) घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. (The-rainy-session-has-no-starred-questions)

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत ५ जुलैपासून सुरू होणार असून, दोनच दिवसांचे राहणार आहे. कमी दिवसांचे अधिवेशन असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनात दोन-तीन विधेयक व पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहे. पुनर्नियोजनाचा विषय सुद्धा येणार असल्याचे सांगण्यात येते. अधिवेशन कमी कालावधीचा असल्याने अनेक विषय टाळण्यात आले. तारांकित प्रश्न व लक्ष्यवेधी सूचनाही घेण्यात येणार नाही.

आपले मुद्दे मांडण्यासाठी सदस्यांनी विविध आयुधे देण्यात आली आहे. त्यात तारांकित प्रश्न व लक्ष्यवेधी सूचनांचा सुद्धा समावेश असल्याचे सांगण्यात येते. याच्या माध्यमातून सदस्य आपल्या भागातील प्रश्न, मुद्दे, समस्या सभागृह मांडून न्याय पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याने याच्या माध्यमातून विषयांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न होतो. अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच सदस्य प्रश्न, मुद्दे लक्षात ठेवून तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सादर करतात.

मुद्दे उपस्थित होणार असल्याने अधिकाऱ्यांवर वचक असते. विधिमंडळाला उत्तर द्यायचे असल्याने प्रशासन कामाला लागते. उत्तर सादर करायचे असल्याने अनेकदा अधिकारी संबंधित विषय मार्गी लावून घेतात. तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नसल्याने अधिकाऱ्यांना उत्तर देण्याच्या कटकटीपासून दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येते.

हे पळपुटे सरकार आहे. राज्यात अनेक मुद्दे, समस्या आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांना न्याय देता आले असते. परंतु, दोन दिवसांचे अल्प अधिवेशन आहे. कोरोनाचा विषय पुढे करून सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यांना सामान्य जनतेचे देणेघेणे नाही. आमचे लेखी प्रश्न घेऊन त्यावर कारवाई करून उत्तर दिले पाहिजे.
- प्रवीण दटके, आमदार, भाजप

(The-rainy-session-has-no-starred-questions)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT