Theft Theft
नागपूर

Crime News : नोकरच निघाला चोर

चोरट्यांनी आत शिरून काऊंटरमधीस १ लाख ६२ हजाराची रोख लंपास केल्याची माहिती समोर आली.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापडाच्या दुकानात झालेल्या चोरीतील सुत्रधार दुकानात काम करणारा नोकर निघाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी धीरज मोहनलाल चंदवानी (वय ४२, रा. जयदीप अपार्टमेंट, मेनरोड, जरीपटका) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रोहन बागडे (वय २०,रा. रामबाग) असे आरोपी नोकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज चंदवानी यांचे गांधीबाग परिसरात ‘श्री गुरूनानक डिस्ट्रीब्युटर’ नावाचे कापडाचे दुकान आहे. या दुकानात रोहन काम करतो. शुक्रवारी (ता.१२) रात्री ते दुकानाला लॉक लावून गेल्यावर दुसऱ्या दिवशी शटर वाकवून चोरट्यांनी आत शिरून काऊंटरमधीस १ लाख ६२ हजाराची रोख लंपास केल्याची माहिती समोर आली.

त्यामुळे त्यांनी तहसील पोलिसांकडे तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. यावेळी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, रोहनसह त्याच्या दोन साथीदारांनी दुकानाजवळ येवून चोरी केल्याची बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे, रोहन तेव्हापासून दुकानात आला नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल करीत, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT