Mohphul Sakal
नागपूर

मोहफुलाच्या गंधाने बहरला आदिवासीबहुल भाग

अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत येतात सुगीचे दिवस

सकाळ वृत्तसेवा

रामटेक - तालुक्यातील आदिवासीबहुल भाग म्हणून देवलापार परिसराची ओळख आहे. हा भाग घनदाट जंगलाने वेढलेला असून येथे विशेषतः आदिवासी लोकांचे वास्तव्य आहे. जंगलात मोहफुलांची असंख्य झाडे आहेत. मोहफुल हे येथील नागरिकांसाठी कमी वेळेत जास्त आर्थिक उत्पन्न देणारे स्त्रोत आहे. तेव्हा विशेषतः मार्च महिना व एप्रिल महिन्याचे काही दिवस या परिसरातील घरोघरी मोहफुलाचा गंध दरवळत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

मोहफुलांच्या उत्पन्नापासून खरिपाची सोय

आदिवासीबहुल भागात पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीला तेवढा वाव नाही. येथे बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या शेतात स्वतःच्या पाण्याची म्हणजेच विहिर अथवा बोअरवेलची व्यवस्था आहे. येथील एक मोठा शेतकरीवर्ग वरच्या पाण्यावर अवलंबून असतो. असे असले तरी मात्र येथील गरीब कास्तकार अस्मानी दयादृष्टीवर सारं काही सोडून म्हणजेच अवलंबून शेती करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी पैशाची तरतूद म्हणून तो या मोहफुल विक्रीपासून मिळणारे धन राखून ठेवतो. त्यापासून खरिपातील शेतपिके उभी करीत असतो. यामुळेच की काय तर या परीसरातील जवळपास प्रत्येकच घरचा किमान एक माणूस या हंगामात या कामात गुंतलेला असतो.

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमींची संख्या

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत जंगल परिसराला लागून असलेल्या लोकवस्तीतील तथा शेताशिवारातील घटना न्याहाळून पाहिल्यास हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र कमी वेळेत जास्त उत्पन्न व आपली खरीपाची सोय होत असल्याच्या दुरदृष्टीच्या विचाराने त्याचा संपूर्ण त्रास व कष्ट व तसेच जिवाला असलेला धोका हे सर्व हिरावल्यासारखे होते व यातच तो समाधान मानतो.

अशी चालतात कामे !

विशेष म्हणजे मोहफुलांपासून मिळणारे उत्पन्न पाहता येथील जवळपास प्रत्येकच घरातील किमान एक व्यक्ती मार्च महिन्यापासून तर एप्रिल महिन्याचे काही दिवस या कामात गुंतलेला असतो. जंगलात जाणे, मोहफुलाचे झाड शोधणे, मोहफुल वेचणे, ते घरी आणणे व ते अंगणात वाळविल्यानंतर मग त्याची साठवणूक करणे, असा त्याचा नित्यक्रम असतो. काही काही घरातील तर बच्चेकंपनी वगळता इतर सर्वच सदस्य याच कामात लागलेले असतात.

हे असतात धोके !

हे काम वाटायला साधे असले तरी मात्र तेवढे सोपे नाही. कारण या कामात कष्टासोबतच जिवाला धोकासुद्धा असतो. ते म्हणजे असे की सध्याच्या तपतपत्या उन्हात मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेल्यावर अंगाची अक्षरश: लाहीलाही होऊन घामाने जणू अंघोळच होत असते. गरीब माणूस जंगलात जातांना सायकलवर बसून जातो, तर येतांना मोहफुलाचे ओझे असल्याने कितीतरी दुरुन त्याला तपतपत्या उन्हात पायदळच पाय मोजत यावे लागते. तसेच या कामात जिवाला सुद्धा तेवढाच धोका असतो. कारण विशेषतः मोहफुलाचे झाड हे घनदाट जंगलातच आढळून येतात. त्यामुळे लोकांना जंगलात जाऊन मोहफुलांच्या झाडाचा शोध घेऊन मोहफुल आणावे लागतात. तेव्हा जंगलातील हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची भिती कायम लागून असते, ही येथील स्थिती आहे.

अशी चालतात कामे !

विशेष म्हणजे मोहफुलांपासून मिळणारे उत्पन्न पाहता येथील जवळपास प्रत्येकच घरातील किमान एक व्यक्ती मार्च महिन्यापासून तर एप्रिल महिन्याचे काही दिवस या कामात गुंतलेला असतो. जंगलात जाणे, मोहफुलाचे झाड शोधणे, मोहफुल वेचणे, ते घरी आणणे व ते अंगणात वाळविल्यानंतर मग त्याची साठवणूक करणे, असा त्याचा नित्यक्रम असतो. काही काही घरातील तर बच्चेकंपनी वगळता इतर सर्वच सदस्य याच कामात लागलेले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Crime News: हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना; गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने घेतला गळफास

Diesel Supply Crisis : डिझेल टंचाईचे संकट गडद; दिवाळीनंतर दरवाढीची शक्यता, महागाईची आणखी झळ बसण्याची भीती

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Pune Bengaluru Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! हिरेबागेवाडी ते हालगा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू; ऊस दराच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT