nagpur sakal
नागपूर

Nagpur News : कळमना मार्केट यार्डमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा

केंद्रीय मंत्री गडकरी : चिखलीतील किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कळमन्यात किराणा बाजारासाठी जागतिक दर्जाचे मार्केट यार्ड तयार होणार आहे. १६ एकरात तयार होणाऱ्या या मार्केट यार्डमध्ये प्रत्येक व्यापाऱ्याला पार्किंग निःशुल्क देण्यात येईल. या मार्केटमुळे इतवारीतील वाहतूक कोंडी फुटणार आहे. परंतु, व्यापाऱ्यांनी इकडे पण दुकान अन् तिकडेही दुकान, असे करू नये, अशी सूचना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

दि नागपूर इतवारी किराणा मर्चेंट असोसिएशनच्या पुढाकाराने चिखली येथे स्मार्ट सिटीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या किराणा बाजार कळमना मार्केट यार्डचा भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार कृष्णा खोपडे, दि नागपूर इतवारी किराणा मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप रामबहादूर सिंह, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मंत्री, निलेश सूचक, संयोजक हरिश कृष्णाणी, सचिव प्रमोद सेदानी, अशोक वाधवानी, आर्किटेक्ट वीरेंद्र खरे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, इतवारीमध्ये अनेक व्यावसायिकांनी घरे खरेदी करून तिथे गोदाम केले. त्यामुळे इतवारी आणखी दाटीवाटीचे क्षेत्र झाले. मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलपर्यंत चारपदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची जागा जाणार असून त्यापूर्वी त्यांना व्यवसायासाठी जागा मिळावी, हा उद्देश होता. प्रस्तावित मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांना २१०० रुपये वर्ग फूट दराने जागा मिळणार आहे.

दुकानदारांना भविष्यात ही जागा विकायची झाल्यास मोठी रक्कम त्यांना मिळेल. याशिवाय इतवारीतील पोहा ओळ, लोहा ओळ, भाजी मार्केटमध्येही संकुल तयार करण्यात येणार असून महापालिकेसोबत चर्चा सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. पूर्व नागपुरात आता अनेक उत्तम सुविधा तयार झाल्या. पारडी उड्डाणपूल तयार झाला असून रेल्वे क्रॉसिंगवरील पूल तयार होणार आहे. याशिवाय अनेक भूमिगत मार्गांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावित मार्केट यार्डमध्ये ये-जा करण्यासाठी अनेक मार्ग तयार होतील. हा परिसर मोकळा असल्याने होलसेल किराणा व्यापाऱ्यांना शुद्ध हवेत व्यापार करता येईल, असे ते म्हणाले.

एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाईल मार्केट

गीता मंदिरापुढील एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाईल मार्केट प्रस्तावित आहे. येत्या एक दोन महिन्यांत काम सुरू आहे. केळीबाग रोड, महाल, गांधीबाग, इतवारीतील कपड्यांचा बाजार येथे स्थानांतरीत होईल. कळमना मार्केट यार्ड व टेक्सटाईल मार्केट तयार झाल्यास इतवारीत वाहतूक कोंडी होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

चारपटीने व्यवसायात वाढ होईल : फडणवीस

गेल्या अनेक वर्षांपासून इतवारी बाजार स्थानांतरीत करण्याबाबत केवळ चर्चा व्हायची. परंतु आता केंद्रीयमंत्री गडकरी यांनी या प्रकल्पाला मूर्त स्वरुप दिले. देशातील सर्वात सुंदर यार्ड तयार होईल. येथे चारपट व्यवसाय वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT