विदर्भ साहित्य संमेलन sakal
नागपूर

विदर्भ साहित्य संमेलन मार्चमध्ये होणार चंद्रपुरात

विदर्भातील जुने नवे असे एकूण शंभराच्या वर लेखक-कवी सहभागी होणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे ६८ वे साहित्य संमेलन चंद्रपुरात आयोजित करण्याच्या गोंडवन शाखेच्या प्रस्तावाला विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाने मंजुरी दिली आहे. हे संमेलन २५ ते २७ मार्च या काळात चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात होणार आहे.

संमेलनाचे मुख्य संवर्धक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, स्वागताध्यक्ष म्हणून आमदार किशोर जोरगेवार आणि संरक्षक म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंडवन शाखेचे अध्यक्ष डॉ. शरच्चंद्र सालफळे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाली. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विदर्भातील जुने नवे असे एकूण शंभराच्या वर लेखक-कवी सहभागी होणार आहेत.

या बैठकीत विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय समितीचे प्रमुख श्री. प्रदीप दाते उपस्थित होते. संमेलनाच्या एकूण आयोजनाच्या दृष्टीने कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी या सभेत मार्गदर्शन केले. या सभेत केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. श्याम मोहरकर, शाखा सचिव इरफान शेख, संमेलन समितीचे संयोजक श्याम हेडाऊ, गोपाल शिरपूरकर, प्रा. श्याम धोटे, मो. बा. देशपांडे, प्रा. नरेंद्र टिकले, श्रीकांत साव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

भरगच्च कार्यक्रम

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण तेरा सत्र आयोजित होणार असून त्यात दोन कविसंमेलने, कथाकथन, लेखक तुमच्या भेटीला, प्रकट मुलाखत, अभिरूप न्यायालय इत्यादी कार्यक्रमांसोबतच ‘पर्यावरण, अरण्ये आणि कृषिसंस्कृती : आजचे प्रश्न’, ‘मराठी साहित्यातील स्त्रीवाद आज शिल्लक आहे काय?’, मराठी साहित्यातील विविधप्रवाही साहित्यधारा आणि संत साहित्य आणि वर्तमान समाजभान, या महत्त्वाच्या विषयांवरील परिसंवादांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT