Nagpur sakal
नागपूर

यवतमाळ : पांदण रस्त्यांचे ‘मिशन’ अर्धवट

रस्ते अतिक्रमित; पहिल्या टप्प्यात होणार होते दोन हजार किमीचे रस्ते

चेतन देशमुख- सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्ते अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पांदण रस्ते मोहीम ‘मिशन’ म्हणून हाती घेतली होती. त्यासाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’चे नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले. मात्र वर्षभरानंतरही हे मिशन अर्धवट स्थितीत असून, शेतकरी पांदण रस्त्यांची प्रतीक्षा करीत आहे.

यांत्रिकीकरणामुळे शेतात पेरणी, आंतर मशागत, कापणी, मळणी व इतर शेतीपयोगी कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामुग्रीची वाहतुक करण्यासाठी गावागावांत पांदण रस्ते आवश्यक आहेत. पावसाळ्यात पांदण रस्त्यांअभावी चिखल तुडवीत जावे लागते. शेतीपयोगी यंत्रसामुग्रीची ने-आण करताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी पांदण रस्त्यांची मोहीम सुरू करण्यासंदर्भात नियोजन केले होते. त्यापूर्वी पालकमंत्री मदन येरावार यांनीही पांदण रस्त्यांच्या विषयाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी ही मोहीम ‘मिशन’ म्हणून स्वीकारली होती.

शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार रस्त्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात दोन हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे निश्चिच झाले होते. या कामांकरिता खासदार-आमदार स्थानिक विकास निधी, १४ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, जि. प. शेष फंड, रोहयो, ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान, ग्रामपंचायतींचे महसुली उत्पन्न, ‘पेसा’अंतर्गत असणारा निधी, नावीन्यपूर्ण योजनांचा निधी, जनसुविधा व मोठ्या ग्रामपंचायतींतील नागरी सुविधा फंड, ठक्करबाप्पा, खनिज विकास निधी आदी बाबींतून निधी उपलब्ध केला जाणार होता. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंत्यांना जेसीबी, पोकलॅन्ड मशीनचे दर, डिझेलचा खर्च याबाबत दर घेऊन निविदाप्रक्रियेबाबत जबाबदारी दिली होती. प्रत्यक्षात वर्ष लोटूनही अद्याप पांदण रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे अजूनही पांदण रस्त्यांचे मिशन ‘अर्धवट’स्थितीतच आहे.

दुसरी दिवाळी आली तरी...

जिल्ह्यात पालकमंत्री पांदण रस्त्यांचा शुभारंभ गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी एकाच वेळी करण्याचे नियोजन होते. या कामात पारदर्शकता आणण्याकरिता व या रस्त्यांचे काम नियमित होते की नाही, हे तपासण्याकरिता पांदण रस्ते संकेतस्थळ विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. त्यात रस्त्यांचे पूर्वीचे, काम सुरू असल्याचे व रस्ता पूर्ण झाल्यानंतरचे फोटो, रस्त्याची लांबी-रुंदी, कामांवर खर्च करण्यात आलेली रक्कम आदी संकेतस्थळावर अपलोड करणे इत्यादींचा समावेश होता. मात्र, दुसरी दिवाळी आल्यानंतरही या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT