Youth atrocities on a fifth grader Nagpur crime news 
नागपूर

बापरे! पाचवीच्या विद्यार्थिनीवर युवकाचा बलात्कार; बहीण घरी आल्याने सत्य आले समोर

अनिल कांबळे

नागपूर : एमआयडीसी परिसरात शेजारी राहणाऱ्या युवकाने पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. मुलीची मोठी बहीण अचानक घरी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ‘आमचे एकमेकांवर प्रेम असून, संमतीनेच अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले’ असा दावा आरोपीने केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षांची मुलगी ही आईवडील, दोन बहिणी आणि भावासह एमआयडीसी परिसरात राहते. तिचे वडील एका कंपनीत कामगार आहेत तर आई मोलमजुरी करते. तिच्या घराशेजारी राजदेव टेंगर शाह (१९) हा राहतो. त्याचे वडील आणि मुलीचे वडील एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे त्या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते.

राजदेव हा नेहमी मुलीच्या घरी राहत होता. त्याचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिलाही तो आवडत होता. त्यामुळे त्याच्यावर कुणीही संशय घेत नव्हते. बुधवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत मोठी बहीण शिवनक्लासला गेली होती तर लहान भाऊ घरी खेळत होता. राजदेव दुपारी एक वाजता घरी आला. त्याने मुलीच्या भावाला पैसे दिले आणि चिप्स खाण्यासाठी बाहेर पाठवले. घरात कुणीही नसल्याची संधी साधून राजदेव घरात मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.

याच दरम्यान क्लासला दांडी मारून तिची बहीण घरी आली. घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे थेट ती बेडरूममध्ये गेली. तिला राजदेव नग्नावस्थेत दिसला तर बहिणही नको त्या अवस्थेत दिसली. तिने केर काढण्याचा झाडू घेतला आणि राजदेवची पिटाई केली. तो घरातून अर्धनग्नावस्थेतच पळून गेला. त्यानंतर तिने बहिणीलाही चांगले धुतले.

सायंकाळी सहा वाजता आईवडील कामावरून घरी आले. घडलेला प्रकार बहिणीने त्यांना सांगितला. त्यांनी राजदेवच्या पालकांशी चर्चा केली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून राजदेवला अटक केली. ‘आमचे एकमेकांवर प्रेम असून, संमतीनेच अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले’ असा दावा आरोपीने केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : पुण्यात आज MPSC विद्यार्थ्यांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT