NGP 
विदर्भ

विधानसभा अध्यक्षांनी पाळला सानिकाला दिलेला शब्द

सुरज पाटील

यवतमाळ : सुख पाहता जवापडे, दु:ख पर्वताएवढे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. यवतमाळ जिल्ह्यातील एक होतकरू हुशार तरुणी सानिका. वर्षभराच्या मेहनतीनंतर तिची दहावीची परीक्षा आणि दैवैने दावा साधला. सानिकाचे वडील काळाने हिरावून नेले. मात्र हिवरी येथील सानिका पवार हिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही तिने संस्कृत विषयाचा पेपर देवून त्यात १०० गुण मिळविलेत.

तिला दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या यशाचे वृत्त कळताच विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सानिकाशी थेट भ्रमणध्वनीवरून संवाद साधला होता. त्यावेळी यवतमाळ येथे आल्यावर भेटीसाठी येईल, असा शब्दही त्यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी (ता.चार) विधानसभाध्यक्ष पटोले यांनी हिवरी येथून जिल्हा दौऱ्याची सुरुवात करून सानिकाला दिलेला शब्द अखेर पाळला.

सानिकाने वडिलांच्या निधनानंतरही दहावीची परीक्षा दिली. ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्या दिवशी सानिकाचा "संस्कृत' विषयाचा पेपर होता. सानिकाने अशा बिकट परिस्थितीत देखील दहावीचा पेपर देऊन त्यात १०० पैकी १०० गुण मिळवलेत. दहावीच्या परीक्षेत तिला ९७ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाने भारावून विधानसभाध्यक्ष पटोले यांनी तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. तसेच यवतमाळ येथे आल्यानंतर भेटीला येण्याचा शब्दही त्यांनी सानिकाला दिला होता. त्याप्रमाणे ते सानिकाच्या भेटीली आले. यावेळी विदर्भ किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, माजी आमदार विजय खडसे, वामनराव कासावार, बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सानिकाची शिक्षणाची व्यवस्था लातूर येथे
विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी शब्द पाळत सानिकाची पुढील शिक्षणाची व्यवस्था लातूर येथे करून दिली. शिवाय एक लाख रुपयांचा धनादेशही दिला. लातूर येथे तिला मेसची व्यवस्थाही करून दिली आहे. सानिकाला डॉक्‍टर व्हायचे आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी प्रशासकीय सेवेत येऊन लोकांची सेवा करण्याचा सल्ला सानिकाला दिला.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT