विदर्भ

नवोदय बॅंक घोटाळा, तत्कालीन सीईओ चट्टे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे (47) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे महालातील नटराज टॉकीजमागील घरूनच त्याच्या मुसक्‍या आवळल्या. घोटाळ्यात त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सोबतच प्लॉट खरेदीसाठी कोणतेही तारण न ठेवताच त्याने स्वत:च्या नावे कर्ज घेतले. परतफेड मात्र केली नसल्याची बाब तपासात पुढे आली आहे. 
माजी आमदार अशोक धवड अध्यक्ष असलेल्या नवोदय बॅंकेत कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आला आहे. चट्टे हा 2007 ते 2012 दरम्यान बॅंकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होता. त्याने फरार आरोपी सचिन मित्तल व बालकिशन गांधी यांच्या ग्लॅडस्टोन समूह, हिंगल समूह, झाम समूह, जोशी समूहाला तसेच अन्य कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता न तपासता कर्ज मंजूर केले. तसेच तारण म्हणून सादर केलेल्या मालमत्तेची कोणतीही पडताळणी न करता बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड, संचालक मंडळ व कर्जदारांसोबत हातमिळवणी व संगनमत करून त्यांना बॅंकेच्या एक्‍सपोजर लिमिटपेक्षा कितीतरी पटीने जास्त कर्ज मंजूर केले. नोव्हेंबर 2009 मध्ये प्लॉट खरेदीसाठी स्वत: साडेसात लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतले. त्यासाठी मालमत्ता मात्र गहाण ठेवली नाही. काही प्रमाणात त्यांनी परतफेड केली खरी, पण 16 मे 2012 रोजी नोकरी सोडल्यापासून परतफेड बंद केली. जून 2017 पर्यंत चट्टेकडे मुद्दल व व्याजाचे एकूण 5.55 लाख रुपये थकीत होते. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे पथक चट्टेच्या मागावर होते. तो घरी असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे बुधवारी छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 22 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
बॅंकेच्या लेखा परीक्षण अहवालात 38.75 कोटींच्या अपहाराची बाब अधोरेखित झाली आहे. या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी जेलबाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी, नेमकं कारण काय ?

Womens Day: महिला दिनी काशीत महिलांना 'व्हीआयपी' एन्ट्री; तिकिटाशिवाय मिळणार प्रवेश, पाहा काय आहे वेळ?

T20 WC, IND vs NZ: सेमीफायनल झाली, आता फायनलची बारी! MS Dhoni सूर्याच्या टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल; Video

Inspiring Women Story: हनीमून सोडून समाजसेवा निवडली! ३०० बेवारस मनोरुग्णाची झाली आई, जगासमोर मोठं उदारहण

Beed News: एकाच महिन्यात महिलेचे तीनदा लग्न; बळजबरीमुळे कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पुण्यातून चालतंय लग्नाचं रॅकेट

SCROLL FOR NEXT