Nitin Gadkari 
विदर्भ

वाघिणीला मारले, त्यात मुनगंटीवारांचा काय दोष? : गडकरी

सकाळवृत्तसेवा

नागपूर : वाघीण नरभक्षक झाली होती. तिने सुमारे तेरा जणांचा बळी घेतला. त्यामुळेच तिला ठार मारावे लागले. मात्र, त्यावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वनमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन तिला मारले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचा जोरदार बचाव केला. 

"अवनी'ची पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत होती. तिने तेरा लोकांना फस्त केले. तेरा लोकांचा बळी घेतला तेव्हा कुणालाच कंठ फुटला नाही, त्यांना गरिबांचा कळवळा आला नाही. वाघिणीला मारण्याचे मी समर्थन करीत नाही; मात्र तिला असेच सोडून दिले असते तर आणखी अनेकांचा जीव घेतला असता. वनविभागाने तिला जिवंत पकडण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र ती हाती लागली नाही. वाघिणीला ठार मारण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार वनविभागाने केली. वाघीण मेल्याचे मलाही दुःख आहे. मात्र, त्यावरून ज्या पद्धतीने राजकारण सध्या केले जात आहे, ते जास्त दुर्दैवी आहे.

वनमंत्र्यांचा राजीनामा मागणे हास्यास्पद असल्याचेही गडकरी म्हणाले. भाजपच्या नेत्या तसेच केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता गडकरी यांनी, "मी जे सांगितले त्यातच सर्वकाही आल्या'चे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात २० हून अधिक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2026

मोकळे व्हा : नात्यातील वागणूक आणि सवयी

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

Video: स्कूल व्हॅनला ट्रेनची जोराची धडक, ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांचा मृत्यू; रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना दुर्दैवी अपघात

SCROLL FOR NEXT