walker 
विदर्भ

काय हे दुर्दैव!"डान्सर' हिरो अशी ओळख असलेला तो आता चालतो कुबड्यांवर

सुरज पाटील

यवतमाळ : एकेकाळी स्टेजवर थिरकणारी त्याची पावले आता आधाराविना उभीही राहू शकत नाहीत. नृत्यात निपुण असल्याने अगदी कमी वयात "डान्सर' हिरो ही ओळख मिळाली होती. मात्र नियतीला ते मंजुर नव्हते. आयुष्याची सोनेरी स्वप्ने बघत असतानाच काही वर्षांपूर्वी एव्हीएन या दुर्धर आजाराने त्याला ग्रासले. रंगमंचावर थिरकणाऱ्या पायाला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. उपचारासाठी डॉक्‍टरांनी सहा लाखांचा खर्च सांगितला. वडील सुतार काम करीत कुटुंबाचा गाडा ओढतात. इतकी मोठी रक्कम आणायची कुठून, हा प्रश्‍न कुटुंबीयांना सतावतो आहे.

भूषण लक्ष्मण क्षीरसागर, असे एव्हीएन आजाराने ग्रासलेल्या तरुणाचे नाव आहे. यवतमाळ शहरातील अंबिकानगरात वास्तव्यास असलेल्या तरुणाचे वय अवघे २२ वर्षे आहे. एकेकाळी त्याचे पाय रंगमंचावर थिरकायची. डान्स क्‍लासेसच्या माध्यमातून त्याने कित्येक कलाकार घडविले आहेत. नृत्य स्पर्धेत भूषणने पारितोषिकांवर आपल्या नावाची मोहोर उमटविली आहे. काही वर्षांपूर्वी आजाराने पछाडले आणि नृत्यासह बीएचे शिक्षणही अर्ध्यांवरच सोडावे लागले.

भूषणचे नृत्य बघून रसिकांच्या तोंडातून कौतुकाचे उद्गार बाहेर पडायचे. ऐन उमेदीच्या काळात त्याला दुर्धर आजाराने पछाडले. कमरेखाली चेतना असली तरी चालता येत नाही. हा त्रास आणखीनच वाढत चालला आहे. आजवर नातेवाइक, मित्रमंडळी यांनी आपापल्या परीने मदत केली. आई-वडीलांनी पैसा जोडून दोन लाखापर्यंतचा खर्च केला. शासन स्तरावर कोणतीही मदत मिळू शकली नाही. त्याच्यावर दिल्ली येथेच उपचार होऊ शकतात. मात्र, सहा लाखांची रक्कम जमा करणे सुतारकाम करणाऱ्या वडिलांना अवघड जात आहे. परिणामी उपचाराअभावी दीड वर्षापासून तो घरांतच आहे.

सविस्तर वाचा - माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर थेट आरोप! वाचा नेमके काय म्हणाले

दानशुरांकडून मदतीची अपेक्षा
भूषण क्षीरसागर याच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे. त्याचा खर्च जवळपास सहा लाख रुपये आहे. दानशुरांनी मदतीचा हात पुढे केल्यास एक डान्सर पुन्हा आपल्या पायावर उभा होऊन जीवन जगू शकेल. मदतीसाठी भूषणच्या ८७६६४४७८१७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT