Outbreak of Glanders disease in equine animals in Bhandara district 
विदर्भ

नवरदेवांवर आली ‘घोड्यावरून वरात नाको रे बाबा!’ म्हणण्याची वेळ

दीपक फुलबांधे

भंडारा : भंडारा नगर परिषद क्षेत्रातील घोडे व खेचरांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हा आजार संसर्गजन्य असून, मानवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात घोडे, गाढव खेचरांचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामुळे सध्या लग्नसराई सुरू असली तरी ‘घोड्यावरून वरात नको रे बाबा’, असे म्हणण्याची वेळ नवरदेवांवर आली आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून देशाची गती रोखून बसलेल्या कोरोनामुळे कर्मचारी, कामगार, विद्यार्थी व उद्योजक सर्वच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे कधीही न थांबणाऱ्या भारतीय रेल्वेच्या चाकांनी अजूनही पुरेसा वेग घेतलेला नाही.

त्यानंतर डिसेंबरपासून राज्यात विविध ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याने पोल्ट्री उद्योगावर अवकळा आली. यातच आता अश्‍ववर्गीय प्राण्यांमध्ये ग्लॅंडर्स आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पशुसंवर्धन विभागाने देशात प्रसार होत असलेल्या आजाराबाबत वेळेवरच नमुने गोळा करून प्रयोगशाळेतून तपासणी केली.

भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील घोडे, खेचरांमध्ये या आजाराचे लक्षण असून, त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील घोडावर्गीय प्राण्यांमधील रोग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने सदर प्राण्यांची जिल्ह्यातून ने-आण करण्यास मनाई केली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT