Devendra Fadnavis sakal
विदर्भ

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०३० पर्यंत भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे. सामान्य माणसाचा तसेच गरीब माणसाच्या कल्याणाचा अजेंडा आखला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

साकोली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे. सामान्य माणसाचा तसेच गरीब माणसाच्या कल्याणाचा अजेंडा आखला जात आहे. सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना तयार होत आहे. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत.

२०३० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळत आहे. यासोबतच खासदार सांस्कृतिक महोत्सवांनी तरुणांच्या कलेला वाव मिळवून दिला आहे. त्याबद्दल खासदार सुनील मेंढे यांचेही मी अभिनंदन करतो आहे.

यासोबतच केंद्र सरकार बरोबरच महाराष्ट्रच्या राज्य सरकारने ही शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारसोबतच आणखी सहा हजाराची भर घालून शेतकऱ्यांना आता सन्मान निधी १२ हजार रूपये दिले जात आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या धानाला पाचशे रुपयाचा बोनसही राज्य सरकारने दिला आहे.

मागेल त्याला शेततळे राज्य सरकारकडून दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी कुठलीही अट न घालता अनेक योजनांचा लाभ दिला जात आहे. यासोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना कुठलीही अट न ठेवता पाच लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य उपचार मिळणार आहे.

यासोबतच पुढल्या वर्षी पर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाचे सिंचनाचे काम पूर्ण करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेतीला पाणी उपलब्ध उपलब्ध होऊ शकणार आहेत. आपलं राज्य सरकार हे सामान्य लोकांच्या गरिबांच्या तसेच शेतकऱ्यांच्या नेहमी सोबत आहे.

यासोबतच गोसेखुर्द मध्ये जलसिंचनासोबतच साडेचारशे कोटींचा पर्यटन जलपर्यटन सुद्धा चे काम सुरू आहे, त्यामुळे सिंचना सोबत पर्यटनातूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे जगाच्या नकाशावर पर्यटनाच्या बाबतीत भंडारा आणि नागपूर जिल्हा येणार आहे, असे प्रतिपादन आज शनिवार दिनांक ७ ऑक्टोबरला साकोली येथील परेड ग्राउंडवर आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील भाऊ मेंढे यांनी केले होते. त्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री परिणय फुके माजी आमदार संजय पुराम,भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, प्रदीप पडोळे माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते ,विजय रहांगडाले, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, सोमदत्त करंजेकर, विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, धनवंता राऊत, रचना गहाणे, माहेश्वरी निवारे, वनिता डोये, अमोल हलमारे, निशिकांत ईलमे, नितीन खेडीकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी मेंढे यांनी केले. तसेच यावेळी खासदार सुनील भाऊ मेंढे यांनीही मार्गदर्शन करताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात असल्याची माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन राधेश्याम मुंगमोडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT