विदर्भ

प्रेयसीच्या अत्याचाराची चित्रफीत टाकली फेसबुकवर; चंद्रपुरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : प्रेमात वितुष्ट आल्यानंतर दुरावलेल्या प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ (Bad videos) तयार केला आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बनावट आयडी तयार करून फेसबुकवर (Bad video Posted on Facebook) टाकला. पीडिताच्या तक्रारीवरून आराेपीला अटक करण्यात आली आहे. सन्मुखसिंग हनुमानसिंग बुंदेल (वय २५) असे आराेपीचे नाव आहे. ताे शहरातील शिवाजी वाॅर्डातील रहिवासी आहे. (Posted-a-video-of-his-girlfriend's-atrocities-on-Facebook-in-Chandrapur)

सन्मुखसिंगचे  शहरातील एका २९ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या. परंतु, काही दिवसांतच दाेघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. प्रेयसीला धडा शिकविण्याचा निर्धार प्रियकराने केला. वाद मिटवायचा आहे असे म्हणून एक जून राेजी त्याने तिला जंगलात बाेलविले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्याचे स्वतःच्या भ्रमणध्वनी मध्ये चित्रीकरण केला.

शुक्रवारी तिचा वाढदिवस हाेता. याचे निमित्त साधून त्याने बनावट फेसबुक आयडी तयार केली आणि व्हिडीओ अपलाेड केला. या अत्याचाराच्या चित्रफितीने बल्लारपुरात एकच खळबळ उडाली.  या चित्रफितीत  दिसणारी युवती बल्लारपुरातील आहे, याची माहिती लाेकांना झाली. युवतीच्या कुटुंबीयांना याची माहिती झाली. त्यानंतर पीडिताने बल्लारपूर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी  सन्मुखसिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(Posted-a-video-of-his-girlfriend's-atrocities-on-Facebook-in-Chandrapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT