pregnant woman calls health authorities driver skilled safe delivery of blind woman  Sakal
विदर्भ

Amravati : वेळ १२ ची...गर्भवती महिलेचा अधिकाऱ्यांना फोन; चालकाचे कौशल्य, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने दृष्टिहीन महिलेची सुखरूप प्रसूती

Amravati Blind Pregnant Women : गर्भवती महिला दृष्टिहीन असल्याने प्रसंग बाका होता. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविली.

सकाळ वृत्तसेवा

अचलपूर, (जि. अमरावती) : वेळ १२ ची... मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर स्वतः गर्भवती महिलेचा फोन आला, मॅडम जलदी आओ, मेरा पेट दुख रहा है, बहुत दर्द हो रहा है. प्रसंग बाका होता, मात्र वाहन चालकाने वाहन चालविण्याचे कौशल्य पणाला लावून सुखरूप वीस मिनिटांत मनभंग गावात पोहोचविले.

तत्काळ ज्योतीला वाहनात बसविले अन् तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगावगढी प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे मोथा उपकेंद्राच्या डॉक्टर आणि कंत्राटी आरोग्यसेविकेने आरोग्यकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप प्रसूती केली व दोघांनाही जीवनदान दिले.

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोथा उपकेंद्राच्या मनभंग गावातील दृष्टिहीन असलेल्या अति जोखमीच्या महिलेला २७ जून रोजी अकरा वाजेच्या सुमारास प्रसवकळा सुरू झाल्याचा फोन डॉ. नीता नागले यांना आला.

गर्भवती महिला दृष्टिहीन असल्याने प्रसंग बाका होता. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविली. त्या महिलेला धामणगावगढी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले.

त्याठिकाणी सुद्धा कर्तव्यावर असणाऱ्या डॉ. गारठे आणि आरोग्यसेविका कल्पना टेकाम यांच्यासह मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता नागले व कंत्राटी आरोग्यसेविका प्रविणा धाकडे या सर्वांनी आपले कौशल्य पणाला लावून दृष्टिहीन महिलेची सुखरूप प्रसूती केली. सध्या ती महिला आणि तिचे निरोगी जन्मलेल्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती धामणगावगढी आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गारठे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT