Crime news  esakal
विदर्भ

Sakoli Crime : प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिस कारवाई करून गुन्हा दाखल

अश्लील चाळे करून एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला लोकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिस कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) - अश्लील चाळे करून एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला लोकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिस कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती होताच संस्थेने त्याला नोकरीतून बडतर्फ केल्याची घटना येथे घडली आहे. आरोपीचे नाव डॉ. पी. एस. रघू असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असलेला डॉ. पी. एस. रघू हा पंचशील वाॅर्डात भाड्याने राहतो. राष्ट्रीय महामार्गालगत स्टे ईन हाॅटेल समोर असलेल्या बगीचा सायंकाळी मुले खेळतात. बुधवारी सायंकाळी तेथे खेळण्यास आलेल्या एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलवून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करत बॅड टच केला. त्यामुळे मुलगी घाबरून रडत घरी गेली. तिने आईला झालेला प्रकार सांगितला.

तोपर्यंत बगीचात आलेल्या युवकांनाही हा प्रकार माहित झाल्याने संतप्त युवकांनी या प्राचार्याला घराबाहेर काढून त्याचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना बोलवून आरोपी प्राचार्य रघू याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी डॉ. रघू याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्राचार्याचे गैरवर्तन लक्षात घेऊन कॉलेज व्यवस्थापनाने रात्रीच त्याला नोकरीतून बडतर्फ केले आहे. हा उच्चशिक्षित आरोपी दक्षिण भारतीय असून तो लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी नेहमी बोलताना इंग्रजी भाषेचा वापर करत होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमित्रा साखरकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT