विदर्भ

ठाणेदार डोंग्याने अन तहसिलदार किर् जंगलातून मदतीसाठी सरसावले

पावसाने हाहाकार माजविल्यान सामान्य जिवन संकटमय झालय. तालुक्यातील तोहोगाव व परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आहे.

संदीप रायपुरे

पावसाने हाहाकार माजविल्यान सामान्य जिवन संकटमय झालय. तालुक्यातील तोहोगाव व परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आहे.

गोंडपिपरी - पावसाने हाहाकार माजविल्यान सामान्य जिवन संकटमय झालय. तालुक्यातील तोहोगाव व परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आहे. अशातच तोहोगावातील वाघाडे कुटुंबातील साहील नावाच्या मुलाला मेंदूज्वर झाला. गावात आरोग्य केंद्र आहे. पण त्याची गंभीर अवस्था बघता चंद्रपूरला रेफर करण्याचा सल्ला मिळाला. चहूबाजूने पाणीच पाणी आता कस होणार हि मोठी चिंता होती. अशावेळी गावातील संवेदनशिल माणस धाऊन आली. तहसिलदार के. डी. मेश्राम, कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच ते अँक्शन मोडवर आले.

तहसिलदार मेश्राम यांनी अँम्ब्लूलन्स घेत कन्हाळगाव मार्ग गाठण्याचे ठरविले. भिर जंगलात मोठ झाड आडव आल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही. मुलाची तब्ब्बेत बिघडत असल्यान कुटु़ंबियाची चिंता वाढली. अशी गःभीर अवस्थेत कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण पुढे आले. त्यांनी डोंग्याच्या मदतीन गाव गाठला. अन रूग्णाला घेऊन ते चार नंबर जंगलात उभ्या असलेल्या आँम्ब्लूलन्सपर्यत आले. मग तातडीन साहिल ला जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.

पावसान सामान्यजणांचे हाल न बघविणारे आहेत. अशा स्थीतीत कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण, तहसिलदार मेश्राम यांनी दाखविलेल्या कर्तव्यतत्परतेने साहिलला पुढील उपचारासाठी चंद्रपूर गाठता आले. प्रशासनातील अधिकारी संवेदनशिल असले कि सामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो याची अनुभुती आज मेश्राम, चव्हाण यांनी दाखविली.

तोहोगावाचे उपसरपंच फिरोज पठाण व गावकर्यांनी औदार्य दाखविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT