अचलपूर शहरात गस्त घालताना पोलिस पथक. Sakal
विदर्भ

अचलपुरात झेंड्यावरून दोन गटात राडा

शहरात तणाव; जमावबंदी लागू, पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

अचलपूर - अचलपूर शहरात रविवारी (ता. १७) सायंकाळी दहा वाजेच्या सुमारास झेंडा काढण्यावरून दोन गटात झालेला वाद विकोपाला गेला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने शहरात सायंकाळी साडेअकरा वाजता जमावबंदी लावण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील २३ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहे. सध्या अचलपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अचलपूर शहरातील खिडकी गेट आणि दुल्हागेट येथील ब्रिटीशकालीन दरवाजांवर दरवर्षी सण-उत्सवप्रसंगी शहरातील नागरिक झेंडे व फ्लेक्स लावतात. यावर्षीसुद्धा झेंडे लावण्यात आले होते. मात्र रविवारी सायंकाळी दहा वाजताच्या सुमारास काही असामाजिक तत्त्वांनी तेथील झेंडा काढल्याने वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेकही केली.

घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. पोलिसांनी २३ जणांना अटक केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली. सध्या अचलपुरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यालयाच्या पोलिस दलासह अकोला पोलिसांनाही संचारबंदीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अचलपूर, परतवाडा, कांडली, देवमाळी या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी अचलपुरात ठाण मांडून बसले आहेत.

पालकमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

अचलपुरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी (ता. १८) समाज माध्यमातून एक ध्वनीचित्रफीत जारी करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असाही संदेश त्यांनी जारी केला. तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असलेल्या ठिकाणाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

भाजप शिष्टमंडळाला घेतले ताब्यात

सोमवारी (ता.१८) जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अचलपूर-परतवाड्याकडे जाण्याच्या तयारीत होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदूर बाजार नाक्यावर रोखले व ताब्यात घेतले. शिष्टमंडळातील नेत्यांना आसेगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात स्थानबद्ध करून ठेवले. त्यात जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (दिघडे), उपाध्यक्ष प्रमोदसिंग गडरेल, जिल्हा महासचिव प्रवीण तायडे, भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, रूपेश लहाने, कुंदन यादव, सुमित चौधरी, प्रशांत शेगोकार, श्यामसिंग गडरेल आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT