Sahil Waghade of Tohogaon died due to Encephalitis during treatment in Nagpur 
विदर्भ

प्रशासनाची धळपळ व्यर्थ....

तोहोगावच्या त्या तरूणाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू

संदीप रायपुरे

गोंडपिपरी - मेंदूज्वर झालेल्या तरुणाला उपचारासाठी प्रशासनाने, गावकर्याने जिवाच रान केल. पुरात डोंगा टाकून, किर्र जंगलातून त्याला तोहोगावातून चंद्रपूर ला रवाना करण्यात आले. दरम्यान तरूणाची प्रकृती खालावली. अन नागपूरला उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा जिव गेला. अन कुटुंबियांनी हंबरडा फोडला. गावकर्यांना, प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवू न शकल्याचे शल्य आहे.

चंद्रपूर जिल्हाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. नदी, नाल्यांना पुर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला. तर काही गावांना बेटाचे स्वरूप आले. बेटाचे स्वरूप आलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावातील साहील वाघाडे या तरूणाला मेंदूज्वर झाला. पुरातून, घनदाट जंगलातून मार्ग काढीत प्रशासनाने त्याला जिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नागपुरात हलविण्यात आले.

उपचारा दरम्यान साहीलचा रविवारचा रात्री बारा वाजता दरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यूची वार्ता गावात धडकताच गाव हळहळले आहे. दोन वर्षापुर्वी साहीलच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. आता तो हि गेला. एकूलता एक मुलगा गेल्याने वाघाडे कुटुंबियांवर मोठाच आघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

SCROLL FOR NEXT