samruddhi accident family going to Amravati for Gauri-Ganpati 1 killed 3 injured sakal
विदर्भ

Samruddhi Accident : गौरी-गणपतीसाठी अमरावतीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू, 3 जण जखमी

समृध्दी हायवेवरील घटना

सकाळ वृत्तसेवा

कारंजा लाड - महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. समृद्धी महामार्ग घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. समृद्धी मार्गावरील अपघाताचं सत्र काही केल्या कमी होत नाही.

समृद्धी महामार्गावर वाहतूक सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे,त्यामुळे आतापर्यंतअनेकांनी जीव गमावला आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही आपघात थांबत नाही.

मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. वनोजा कारंजा दरम्यान समृध्दी हायवे लोकेशन १९६ जवळ हा अपघात घडला.

समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून कार समोर आले,अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा अपघात झाला.

अपघाताच्या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात अनुज दुरतकर वय ६५ वर्ष पंकज दूरतकर व ३४ वर्ष व भावना दूरतकर वय ३० वर्ष हे तिघे जण गंभीर जखमी झाले तर सुनंदा दुरतकर व ५८ वर्ष यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT