sex racket 
विदर्भ

काय म्हणता... सेक्‍स रॅकेट आणि तेही चंद्रपुरातील पॉश वस्तीत! 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात असलेल्या आणि उच्चभ्रू लोकांची वस्ती समजल्या जाणाऱ्या जगन्नाथबाबा नगरातील एका घरात काही दिवसांपासून सेक्‍स रॅकेट सुरू होते. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी या सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड केला. सोमवारी, 8 जूनच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून नागपूर येथील एका युवतीसह एक महिला आणि दलालाला अटक केली आहे. 

शहरातील जगन्नाथबाबानगर येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. तेथील एका घरात आंबटशौकिनांची वर्दळ वाढली होती. काही महिलांकडून येथे देहविक्री होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी तेथे एक युवती, महिला आणि दलाल आढळून आले. या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यातआलेली युवती नागपूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. 

लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. अशा स्थितीत नागपूरची युवती देहविक्री व्यवसाय करण्यासाठी नेमकी चंद्रपुरात आली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT