Shinde govt minister Dharamraobaba Aatram donated 250 acres of land to Company marathi news  
विदर्भ

Dharamraobaba Aatram : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा मोठेपणा! कंपनीला दान केली २५० एकर जमीन, कारण देखील सांगितलं

Dharamraobaba Aatram News : आत्राम विदर्भातील मागसलेला आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.

रोहित कणसे

नागपूर : आमदार-खासदार तसेच मंत्र्यांनी कुठेतरी मोक्याची जमीन विकत घेतल्याचं आपण नेहमी ऐकत असतो, मात्र याच मंत्र्यांनी स्वतःच्या मालकीची जमीन सामाजीक कार्यासाठी दान केल्याच क्वचितच ऐकायला मिळते. असाच काहीसा प्रकार राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याबाबत समोर आला आहे. आत्राम यांनी स्वतःच्या मालकीची २५० एकर जमीन एका प्रकल्पासाठी दान केली आहे.

आत्राम विदर्भातील मागसलेला आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. आपल्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने मोठा प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड येथे लोह खनिजाचा मोठा साठा असून खानीतून सध्या उत्खणन सुरू आहे. येथील लोह खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी अहेरी येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीचशे एकर जागा त्यांनी सुरजागड इस्पात या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्पा पाच हजार कोटी रुपयांचा आहे. तसेच या प्रकल्पामुळे सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १७ ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. चार टप्प्यात हा प्रकल्प विकसित केला जाणार असून वडलापेठ या परिसरात सूरजागड इस्पात प्राइवेट लिमिटेड कंपनी हा प्रकल्प विकसित करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT