malegav toll naka sakal
विदर्भ

Shirpur News : शहिद दर्जासाठी संतप्त जमावाचे संमृध्दि महामार्ग रोखला

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील शहीद आकाश आढागळे यांचा 10 सप्टेंबर रोजी लेह येथे एका अपघातात मृत्यू झाला होता.

प्रशांत पाटील

शिरपूर जैन - वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील शहीद आकाश आढागळे यांचा 10 सप्टेंबर रोजी लेह येथे एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर 13 सप्टेंबर रोजी शिरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मात्र शहीद आकाश यांचे पार्थिव समृद्धी महामार्गच्या मालेगाव जवळील टोल नाक्यापर्यंत पोहोचल्यानंतर अंतयात्रा काढण्यासाठी सेनादलाची गाडी न आल्याने व शहीदाचा दर्जा मिळावा या कारणावरून संतप्त जमावाने रस्ता रोको सुरू केला आहे.

जवानाचे पार्थिव संमृध्दी महामार्गावर मालेगाव टोलनाक्यावर ठेवण्यात आले आहे. पुलगाव येथून लष्करी वाहन आल्यानंतर सदर जवानावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

शिरपूर जैन येथील जवान आकाश अढागळे यांच्यावर 13 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यादरम्यान शहिदाचे पार्थिव सैन्य दलाच्या गाडीत न आणल्याने उपस्थित जमाव संतप्त झाला होता. व तात्काळ अंत्ययात्रा काढण्यासाठी सैन्य दलाची मोठी गाडी आणण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी तब्बल दोन तास समृद्धी महामार्गवर बंद करून रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे समृद्धी महामार्गवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान शहिदाच्या कुटुंबीयांसमवेत प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला. वाशीम वरून पोलीस प्रशासनची मोठी लॉरी बोलवीण्यात आली व त्यामध्ये शहीद आकाश यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार होती.

मात्र नंतर पुन्हा शहीदाचा दर्जा व लष्करी वाहनाची मागणी जमावाने केली. त्यामुळे सायंकाळी सात वाजेपर्यंत जवानाचे पार्थिव संमृध्दी महामार्गावरच होते. पुलगाव येथून लष्करी वाहन आल्यानंतरच अंत्ययात्रा काढण्यात येईल असा पवित्रा उपस्थित हजारो नागरीकांनी घेतला आहे.

मात्र सदर बाबीमुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली मात्र उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अंत्यसंस्कारांची वेळ तब्बल सहा तास पुढे ढकलल्या गेली. प्रशासनाने मध्यस्ती करून सदर बाबीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सैन्य दलाकडून अशा प्रकारची परिस्थिती उद्भवन्यामागचे कारण कळू शकले नाही. वृत्तलाहेपर्यंत शाहिदाचे पार्थिव शिरपूर येथे पोहोचले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT