Accused Mangesh Kahalkar Sakal
विदर्भ

मुलानेच केला जन्मदात्या वडीलांचा खून

आईला शिव्या दिल्याच्या कारणावरून भांडण

अभय भुते

लाखनी - लाखनी तालुक्यातील खराशी येथे मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसर हादरून गेले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खराशी येथे राहणारे बाबुराव काहालकर (वय ६८) यांचा मंगेश काहालकर (वय २८) या पोटच्या मुलानेच खून केल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.

मंगेश हा आपल्या आई वडिलांसह येथे राहत होता. दारूच्या नशेत यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे परिसरातील नागरिकांचे सांगणे आहे. त्याच पद्धतीने गुरुवारला सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बाप लेकात व आई यांच्यात भांडण झाले. यात मंगेशने लाकडी काठीने मारहाण करत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत फिर्यादी आरोपीची आईच्या बायाना नुसार मृतक हा शिव्या देत असल्याने भांडण झाल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे खराशी परिसर हादरून गेला आहे. सदर घटनेची पालांदूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास बोरकुटे ठाणेदार पोलीस स्टेशन पालांदूर हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT