As soon as the story was over Subhash said goodbye to the world wardha crime news 
विदर्भ

कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप

मंगेश काळे

हिंगणी (जि. वर्धा) : विवाहापासून तर कथेपर्यंतचे सर्व सोपस्कार आटोपले. मात्र, आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याआधीच काळाने झडप घातली. सासुरवाडीतून कथा आटोपून घरी नववधूसह सुखरूप पोहोचण्याऐवजी सुभाषचे पार्थिवच घरी पोहोचले. जे घर मुलाच्या लग्नाने आनंदाने भारावून होते. त्या कुटुंबावर शोककळा पसरली. सुभाष दशरथ मराठे (वय २८, रा. हिंगणी) असे मृताचे नाव आहे.

स्थानिक पुरातन शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या सुभाष मराठे याचा विवाह १९ मार्च रोजी चामोर्शी जि. गडचिरोली येथे वधू मंडपी धूमधडाक्‍यात अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला. सुभाष हा घरचा मोठा मुलगा असून, तोच कमावता होता. तो नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील लोहा कंपनीत साहित्य गुणवत्ता तपासणी पदावर कार्यरत होता.

तो कथेसाठी नववधूसोबत चामोर्शी येथे गेला होता. २४ मार्च रोजी सकाळी कथा आटोपल्यावर जेवणावळी सुरू होत्या. लग्नाच्या लगबगीचा भार एकट्यावर असल्याने चांगलीच दगदग झाली होती. कथा झाल्यावर उसंत मिळाल्याने तो विश्रांती घेत असता त्याला अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे त्याने विश्रांती केली. यानंतर थोडे बरे वाटू लागेल, असे त्याला वाटले. मात्र, त्याने नेहमीसाठीच न परतण्यासाठी जीवनातून विश्रांती घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी सायंकाळी त्याचे पार्थिव घेऊनच नववधू सेलूला पोहोचली. त्याच्यावर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष हा स्थानिक इसार पेट्रोल पंपचे व्यवस्थापक पंकज पुरुषोत्तम वाल्दे याचा मामे भाऊ असून, त्याच्या पश्‍चात वृद्ध आई-वडील, नवविवाहित पत्नी व लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT