Sweepers wife petrol poured on body Nagar Panchayat Gondpipari Sweepers were fired sakal
विदर्भ

सफाई कामगारांच्या बायकांनी नगरपंचायतीसमोर अंगावर टाकले पेट्रोल

गोंडपिपरी नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना कामावरून काढण्यात आले

संदीप रायपुरे

गोंडपिपरी : गोंडपिपरी नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना कामावरून काढण्यात आले.रोजगार गेल्याने या कुटुंबियांवर अक्षरश उपासमारीची पाळी आली. आमदार सुभाष धोटे ,स्थानिक लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करूनही मार्ग न निघाल्याने आज सायकांळी संतापलेल्या सफाई कामगारांच्या बायकांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.गोंडपिपरीत आज घडलेल्या या घटनेने नगरपंचायतीसह,लोकप्रतिनीधींची पुरती पोल खोलली आहे.

गोंडपिपरी नगरपंचायतीने ठेकेदाराच्या संगनमताने मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.रविद्र गेडाम,संजय गेडाम,संतोष बोलीवार,विशाल कुळमेथे चंद्रशेखर गेडाम, अखील, लाकडे, मधूकर शेंडे, मारोती मोहुर्ले या आठ कर्मचाऱ्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला.

जिल्हाधिकारी व न्यायालयात दावा दाखल केला.आपल्या हक्कन्यायमागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.पण त्यांना न्याय देण्याचे सोडून नगराध्यक्षा सविता कुळमेथे व ठेकेदार आनंद देशमुख यांनी संगनमत करून कामगाराःना महिनाभरापुर्वी कामावरून काढून टाकले.नियमाःना डावलीत हा प्रकार करण्यात आला. यामूळ कामगारात तिव्र संताप होता.

दरम्यान याकाळात त्यांनी प्रशासनाकडे आपली समस्या मांडली. आमदार सुभाष धोटेंचेही भेट घेतली,स्थानीक लोकप्रतिनिधीकडे कैफियत मांडली,निवेदन दिलीत तक्रारी केल्या.पण काहीच फायदा झाला नाही.महिनाभरापासून काम नसल्याने आठ कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत होती.त्यामुळ कामगाराःनी आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी निवेदनातून केली होती.

आज सफाई कामगार व त्यांच्या पत्नी एकत्र आल्या. दरम्यान नंदीनी गेडाम, निवृत्ता गेडाम, संध्या लाकडे, उज्वला कुळमेथे, अरूणा मोहुर्ले, रिता बोलीवार या सफाई कामगारांच्या बायकाःनी अंगावर पेट्रोल टाकले.पण उपस्थीतांनी वेळीच प्रयत्न केल्यान अनुचीत प्रकार टळला. दरम्यान सफाई कामगारांच्या पत्नींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी उशिरापर्यत कार्यवाही सूरू होती.

आमदारांकडून उपेक्षाच

आमदार सुभाष धोटे आज गोःडपिपरी दौऱ्यावर होते.दौऱ्याची माहिती मिळताच सफाई कामगारांच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली.महिनाभरापासून सुरू असलेली आफबीती सांगीतली.पण आमदाराःनी युनीअन केल्याने कामगारांवर हि पाळी आल्याचे सांगीत हात झटकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT