Take strict action against police officer in Bhuyar case seek Navneet Rana  
विदर्भ

खासदार नवनीत राणा संतापल्या: 'त्या' ठाणेदार आणि बीट जमदारावर गुन्हे दाखल करण्याची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) ः व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने व तक्रार देण्यास गेल्यावर पोलिसांनी मारहाण केल्यामुळे अपमान सहन न झाल्यामुळे शेतकरी अशोक भुयार यांनी आत्महत्या केली, तर त्यांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने त्यांच्या बंधूचेसुद्धा निधन झाले. या धक्कादायक घटनेला जबाबदार असणारे ठाणेदार आणि बीट जमादार यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आज खासदार नवनीत राणा यांनी केली.

या दोन्ही भावंडांच्या घरी सांत्वना भेटीसाठी आलेल्या खासदार नवनीत राणा यांनी मृताच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीत नोंद असलेल्या अंजनगावचे ठाणेदार आणि धनेगावचे बीट जमादार या दोघांवर आधी गुन्हे दाखल करा, अशी मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली.

गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आमच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने आंदोलन करून प्रशासनाला गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू, अशी भूमिका खासदार नवनीत राणा यांनी घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत ठाणेदार व बीट जमदार या दोघांचे स्पष्टपणे नावे असताना पोलिसांनी फक्त एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु चिट्ठीत उल्लेख असतानाही ठाणेदार आणि बीट जमदार यांना मोकळे का सोडले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

तहसीलदारांकडून चौकशी सुरू

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या भेटीत त्यांनी याप्रकरणाची समिती तयार करून चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी समितीद्वारे चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हा याप्रकरणात कोण कोण दोषी आढळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT