विदर्भ

नातेवाईक आले एकाच्या अंत्यसंस्काराला आणि करून गेले तिघांवर; तीन तासांच्या फरकाने मृत्यू

अभिजित घोरमारे

भंडारा : विदर्भातील भंडारा जिल्हा... भंडारा तालुक्यातीलच माटोरा गाव... गावात वास्तव्यास बोरकर कुटुंब... कुटुंबातील सात सदस्यांनी कोरोना चाचणी केली. यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. काही दिवसांनी तिघांचीही प्रकृती खराब झाली. एकाच दिवशी तिघांचीही तीन तासांच्या फरकाने मृत्यू झाला. यात आई-वडील व मुलाचा सामवेश आहे. बोरकर कुटुंबावर एकाच दिवशी तीन वेळा अंत्यसंस्कार करण्याचा दुर्देवी प्रसंग कोरोनाच्या काळात आला. (Three-members-of-the-same-family-died-three-hours-apart)

कोरोनाने अनेकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावले. कोणी पती-पत्नीला, कोणी मुलाला तर कोणी आई-वडिलांना गमावले. यामुळे अनेक मुलं अनाथ झाली. मात्र, या कठीण काळात कोणीच कोणाच्या मदतीला धाऊन आले नाही. कारण, प्रत्येकाला आपल्या जिवाची चिंता लागली होती. हे मृत्यू काही दिवसांच्या फरकाने झाले. मात्र, एकाच दिवशी तीन अंत्यसंस्कार करण्याची वेळ बोरकर कुटुंबावर आली. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. शहरी भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून माटोरा गावात ग्रामपंचायततर्फे कोरोना चाचणी घेण्यात आली.

या कोरोनाचा चाचणीचा लाभ गावकऱ्यांनी घेतला. बोरकर कुटुंबातील सातही सदस्यांनी कोरोना चाचणी केली. काही दिवसांनी आलेल्या अहवालात सात पैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला. कोरोनाची भीती घेतली की काय उपचार सुरू असतानाच ९० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक महादेव बोरकर यांचा कोरोनाने मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी जड मनानी अंत्यसंस्कार उरकले. तीन तासांनी कुटुंबीय व अन्य नातेवाईक घरी पोहोचत नाही तोच महादेव यांची पत्नी पर्वताबाई बोरकर (८५) यांचाही मृत्यू झाला. घरी आलेले कुटुंबीयांनी पुन्हा अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. कमी वेळात त्यांनी कसे तरी अंत्यसंस्कार पार पाडले. आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचा धक्का मुलगा विनायक बोरकर हे सहन करू शकले नाही. पुन्हा तीन तासांच्या अंतराने त्याचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन धगधगत्या चिता पाहून अनेकांना शोक अनावार झाला होता. बोरकर कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावात प्रत्येक जण हळहळत व्यक्त करीत आहे.

वाटेत झाला मुलाचा मृत्यू

आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच मुलगा विनायक यांची प्रकृती खराब होत गेली. कोही वेळानी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. तसेच त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली. यामुळे कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात नेण्याचे ठरवले. दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

तीन तासांची फरकानी तिघांचा मृत्यू

विनायक यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. यामुळे दोघांवर अत्यंसंस्कार करून परत आलेल्या नातेवाईकांना तिकऱ्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली. अवघ्या काही तासांतच आई-वडील पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. विनायक यांच्या पश्चाच पत्नी, तीन मुले असा आप्तपरिवार आहे.

(Three-members-of-the-same-family-died-three-hours-apart)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT