Bull Market Sakal
विदर्भ

बैलबाजार फुलला, लाखोंची उलाढाल

पशुधन खरेदी-विक्रीसाठी वाढली गर्दी

किशोर मोकलकर

आसेगावपूर्णा (जि. अमरावती) - विदर्भात प्रसिद्ध असलेल्या चांदूरबाजारचा बैलबाजार फुलू लागला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन खरेदी-विक्रीसाठी येत आहे. रविवारी भरणाऱ्या बाजारात १०० ते १५० बैलांची खरेदी विक्री होऊन लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. कोरोना महामारीमुळे गत दोन-अडीच वर्षांपासून चांदूरबाजार येथील रविवारी भरणारा बैलबाजार शासनाच्या आदेशावरून बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला या बाजारामुळे चालना मिळाली आहे.

चांदूरबाजार येथील रविवारी भरणारा बैलबाजार शासनाच्या आदेशावरून बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची अडचण होत होती. कारण, दरवर्षी बहुतांश शेतकरी आपल्या बैलाची अदलाबदल करतात. आपल्याकडील बैलजोडी विक्री करून नवीन खरेदी करतात. यंदा कोविडचे संकट दूर झाल्यामुळे चांदूरबाजार येथील बैलबाजारास सुरुवात झाली आहे. हा बाजार सुरू होऊन जवळपास दोन ते तीन महिने झाले आहे.

मार्चमध्ये सुरुवातीला बाजारात पशुधनाची संख्या कमी होती. मात्र, दिवसेंदिवस बैलबाजारात पशुधनाची संख्या वाढत आहे. ५० हजारांपासून तर एक लाख रुपयांपर्यंतचे महागडे बैल बाजारात विक्री व खरेदीसाठी येतात. त्याचबरोबर व्यापारी व शेतकऱ्यांची संख्याही खरेदी-विक्रीसाठी वाढत आहे. सध्या बैलाच्या किमतीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. चांदूरबाजार येथे रविवारी भरणाऱ्या बैलबाजारात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून तसेच इतर प्रांतातून व्यापारी बैल खरेदी-विक्रीकरिता येथे येतात. पशुधनाची संख्या घटत असल्याने भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा बैलांच्या किमती वाढल्या

बैलांच्या किमती वाढल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैल खरेदी करणे परवडत नसल्याची स्थिती आहे. पेरणीच्या तोंडावर बैलबाजारात तेजी आल्याने बैलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, शेतीसाठी बैलांची खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया दहिगाव पूर्णा येथील शेतकरी देवानंद खांडेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT