सालेकसा : पिंजऱ्यात कैद केलेले अस्वल. 
विदर्भ

पाण्याच्या शोधात विहिरीत पडली दोन अस्वले...मग वनविभागाने काढले सुखरूप बाहेर

सकाळ वृत्तसेवा

सालेकसा (जि. गोंदिया) : जांभळी येथील शेतातील विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना सालेकसा व गोंदिया वनविभागाच्या चमूने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पिंजऱ्यात कैद करून दोन्ही अस्वलांना घनदाट जंगलात सोडून दिले. शेतात आलेली अस्वले जंगलात सोडण्यात आल्याने जांभळीवासींनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

जांभळी येथील शेतातील विहिरीत दोन अस्वल (नर व मादी) पडल्याची माहिती सालेकसा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना सोमवारी (ता. 18) सकाळी सहाच्या सुमारास मिळाली. या माहितीवरून अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सुखरूप रेस्क्‍यू करण्याकरिता वनविभाग गोंदियाला माहिती देण्यात आली.

पहाटेच पडली असावी विहिरीत

दरम्यान, गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. युवराज यांच्या आदेशान्वये दोन्ही रेस्क्‍यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अस्वलांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढून पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. हे अस्वल पहाटे तीन ते चारच्या सुमारास पाणी पिण्यासाठी विहीरवर आली असावी. मात्र पाण्याच्या शोधात ती विहिरीत पडली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

चार तासांचे रेस्क्‍यू

अस्वलांना विहिरीतून बाहेर काढणे मोठ्या जिकरीचे काम होते. कारण विहीर खोल असल्याने अस्वलांना बाहेर काढणे वनविभागाच्या चमूला कठीण झाले होते. मात्र ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी ए. बी. इलमकर यांच्या नेतृत्वात वनकर्मचाऱ्यांनी चार तासांच्या अथक परिश्रमात पार पाडली. त्यामुळे गावकऱ्यांनीही वनविभागाचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT