Sandip Kursunge and sarang kadrewar sakal
विदर्भ

Accident : कार दुभाजकावर आदळून दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

मित्राच्या लग्नावरून परत येताना भरधाव वेगातील झायलो कार दुभाजकावर चढून पुलाच्या पिल्लरवर आदळली व लोखंडी रेलिंग तोडत दुसऱ्या बाजूला पलटली.

सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) - मित्राच्या लग्नावरून परत येताना भरधाव वेगातील झायलो कार दुभाजकावर चढून पुलाच्या पिल्लरवर आदळली व लोखंडी रेलिंग तोडत दुसऱ्या बाजूला पलटली. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता येथील उड्डाणपुलाखाली नटराज बारसमोर घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, तिघे गंभीर झाले आहेत. मृतांमध्ये संदीप श्रावण कुरसुंगे (वय २५) आणि सारंग मारूती कद्रेवार (वय २५) यांचा समावेश आहे.

येथील चालक विशाल वाघाडे हा त्याचा मित्र वैभव मानकर याच्या लग्नासाठी सोनका (पळसगाव) येथे काही मित्र व नातेवाईकांसाेबत झायलोने (क्रमांक एमएच ५०/ बीजी२६६०) गेला होता. लग्न आटोपून ही सर्व मंडळी साकोलीकडे परत आली. या वाहनामध्ये बसलेल्या महिलांना लाखांदूर मार्गावर सोडले.

त्यानंतर वाहनात बसणारे कुणाल हेमराज ठाकरे व सारंग मारुती कद्रेवार या दोघांनाही घरी सोडण्यासाठी सेंदूरवाफाकडे जात असताना भरधाव वेगातील वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे नटराज बारसमोर हीझायलो दुभाजकावर चढून उड्डाणपुलाच्या पिल्लरवर आदळून उलटली. या अपघातात गाडीत बसलेल्या संदीप कुरसुंगे व सारंग कद्रेवार यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे साकोली व सेंदूरवाफा येथील रहिवासी आहेत.

तसेच चालक विशाल वाघाडे (वय २५), कुणाल ठाकरे (वय १९) व प्रणय बैरागी (वय २४) हे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना येथील आशीर्वाद नर्सिंग होम मध्ये हलविण्यात आले आहे. पोलिसांनी चालक विशाल वाघाडे याच्यावर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदविला असून पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे हे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT