Two hundred rupees counterfeit note has come in the market now Yavatmal news 
विदर्भ

आता बाजारात आली दोनशे रुपयांची बनावट नोट; पोलिस शिपायाची फसवणूक

गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : शहरात मोठ्या प्रमाणात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याने ग्राहक व व्यापारी वर्गांत चांगलीच धडकी भरली आहे. चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशातही बनावट नोट आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट नोटा शहरात आल्याच कशा, याचा पर्दाफास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

कलर प्रिंटरवर झेरॉक्‍स करून बनावट नोटा पेट्रोल पंप, बाजार, दूध डेअरी, हॉटेल आदी ठिकाणी चलनात आणल्या जात आहेत. आता या नोटा सर्वसामान्य ग्राहकांच्याही खिशात गेल्या आहेत. एका पोलिस शिपायाला ही कुणीतरी दोनशे रुपयांची बनावट नोट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दीड वर्षांपूर्वी शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या होत्या.

आता आणखी नव्याने दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आल्यामुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याने तालुक्‍यात रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी बनावट नोटा चालविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफास करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

पोलिसांचा तपास सुरू
शहरात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याच्या तोंडी तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 
- ज्ञानेश्‍वर घुगे,
पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, नेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : उजनी धरणातून भीमा नदीत ३५०० क्युसेक ने विसर्ग सुरू

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT