विदर्भ

"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

मंगेश गोमासे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते. हीच भीती भविष्यात विद्यार्थ्यांना या विषयात "परफेक्‍ट' होण्यास अवघड जाते. त्यामुळे "ऍक्‍टिव्हिटी बेस लर्निंग'द्वारे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांचा इंग्रजीकडे ओढा वाढविण्यासाठी औरंगाबादच्या आंग्लभाषा विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांना "इंग्लिश किट' देण्यात येणार आहे.

नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी तसे जेमतेमचं. नामांकित सीबीएसई शाळांप्रमाणे त्यांना इंग्रजीचा गंध आणि परिसरातील वातावरण मिळत नसल्याने या विषयात रसही निर्माण होण्याची शक्‍यता तशी कमीच असते. मात्र, जागतिक स्तरावरील इंग्रजी भाषेचे महत्त्व बघता, आता नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिली ते आठवीचा विद्यार्थी इंग्रजी विषयात पक्का व्हावा यासाठी औरंगाबाद येथील आंग्लभाषा विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी "इंग्लिश किट' तयार करण्यात आली.

गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न

यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी किट तयार करण्यात आली आहे. किटचा वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. या किटच्या माध्यमातून इंग्रजी विषयाची भीती नाहिसी करणे आणि या विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.


अशी आहे "इंग्लिश किट'

"अक्‍टिव्हिटी बेस लर्निंग'वर आधारित असलेल्या "इंग्लिश किट'मध्ये चित्र, पझल्स, साउंड, कविता, वर्ड, सेंटेनस, व्हाईट बोर्ड, फोर लाइन्स कॉपी यासारख्या विविध वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या आधारे विद्यार्थ्यांचे इंग्रजी पक्के करण्यात येईल. शिवाय विविध वर्कशिटच्या माध्यमातून त्यांच्या मनातील इंग्रजीची भीतीही दूर करण्यात येईल.


आंग्लभाषा विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या "इंग्लिश किट'चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच या किटचा उपयोग शाळांमध्ये होताना दिसेल.
- हर्षा बुराडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, (डायट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT